अवकाळी पावसाचा पिकांना फटका: जळगावातील कांदा, मका, केळी, ज्वारी पिकं भूईसपाट - UNSEASONAL RAIN HITS CROP JALGAON

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : April 15, 2025 at 8:20 AM IST

1 Min Read

जळगाव : अवकाळी पावसानं जळगाव जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. जळगाव, यावल, चोपडा तालुक्यातील अनेक भागात गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कांदा, मका, केळी, ज्वारी ही पिकं जमीनदोस्त झाली असून तातडीनं नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे चोपडा तालुक्यात तब्बल 350 हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चोपडा तालुक्यातील अडावद, धानोरा, मितावली या सह इतर गाव शिवारात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि गारपीट झाली. या गारपिटीसह पावसामुळे गहू, कांदा, केळी, मका आणि इतर पिकांसह फळपीक आदी पिकांना फटका बसला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे चोपडा तालुक्यात तब्बल साडेतीनशे एकर पेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.