रामोजी राव यांचा आकर्षक पुतळा पाहिला का? फोटो आणि व्हिडिओंवरून बनवली देखणी मूर्ती - RAMOJI RAO SILICA STATUE

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : June 9, 2025 at 5:12 PM IST

1 Min Read

हैदराबाद - रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक अध्यक्ष रामोजी राव यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त, रविवारी (8 जून) रामोजी राव यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसवलेला सिलिका पुतळा इतका नैसर्गिक वाटतो, की जणू काही रामोजी राव स्वतः येऊन बसले आहेत. हा सिलिका पुतळा पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतो. रामोजी राव यांचा हा सिलिका पुतळा बेंगळुरू येथील गोम्बेमाने कंपनीने डिझाइन केला आहे. या पुतळ्याला 12 शिल्पकारांनी मुख्य शिल्पकार श्रीधर मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली ६ महिने काम करून बनवले. यावेळी शिल्पकार श्रीधर मूर्ती यांनी सांगितले, की त्यांनी रामोजी राव यांना कधीही प्रत्यक्ष पाहिले नव्हते. रामोजी ग्रुपच्या सदस्यांनी दिलेल्या फोटो आणि व्हिडिओंवर आधारित हा पुतळा तयार केला आला आहे. रामोजी राव यांच्या कुटुंबातील सदस्यांसह CMD सीएच किरण यांनी शिल्पकार श्रीधर मूर्ती यांचे अभिनंदन केले. मूर्ती हे त्यांच्या कुटुंबासह रामोजी राव यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.