गोलीगत सूरज चव्हाणचा 'झापूक झूपुक' चित्रपट येत्या २५ तारखेला होणार प्रदर्शित.... - SURAJ CHAVAN
🎬 Watch Now: Feature Video

पुणे - बिग बॉस विजेता सूरज चव्हाण याचा 'झापूक झूपुक' चित्रपट हा येत्या २५ तारखेला प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन हा चित्रपट केला आहे. या चित्रपटात सुरजनं मुख्य भूमिका साकारली आहे. बिग बॉस या शोमध्ये असताना दिग्दर्शक केदार शिंदे यांनी 'झापूक झूपुक' चित्रपटाच्या बाबत घोषणा केली होती. 'झापूक झूपुक' चित्रपट गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये सूरजचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. तसेच 'झापूक झूपुक'च्या रिलीजपूर्वी सूरज चव्हाणच्या स्वप्नाच्या घराची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली होती आता, याबाबत आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी गोलीगत सूरज चव्हाणशी खास बातचीत केली आहे.