दहावीनंतर करिअर निवडताय? मुलांच्या करिअरबाबत चिंता वाटत आहे? पाहा ही बातमी - CAREER AFTER 10TH
🎬 Watch Now: Feature Video


Published : May 19, 2025 at 2:02 PM IST
|Updated : May 19, 2025 at 2:09 PM IST
पुणे : विद्यार्थ्यांचं पुढील शैक्षणिक भवितव्य ठरविणाऱ्या इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली आहे. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी हे इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याच्या दृष्टीनं महाविद्यालयात प्रवेश घेण्याची तयारी करत आहेत. राज्यात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २० लाखाहून अधिक आहे. अशा स्थितीत आपल्या पाल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये करियरची संधी मिळू शकतात? याबाबत पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम पाहायला मिळतोय. पुढे जाऊन पाल्य कोणते क्षेत्र निवडणार आहोत, हे पाहूनच त्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळवून द्यावा. तसेच फक्त इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय या क्षेत्रातपुरत्या संधी नाहीत. इतर अनेक क्षेत्रात पाल्यांना करियरच्या चांगल्या संधी आहेत. याच करिअरबाबत शिक्षणतज्ज्ञ नवनीत मानधनी यांनी याबाबत मार्गदर्शन केलंय.