पहिला श्रावण सोमवार; परळी वैजनाथ मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी - Shravan 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 5, 2024, 1:28 PM IST

thumbnail
वैजनाथ मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी (ETV BHARAT Reporter)

बीड Shravan 2024 : यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासून (Shravani Somvar 2024) झाली आहे. श्रावण महिना शिवशंकराच्या पूजेसाठी समर्पित असतो. तब्बल 71 वर्षांनी हा योग आल्यामुळं या महिन्याचं विशेष महत्त्व आहे. या निमित्तानं राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महाराष्ट्रातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या (Fifth Jyotirlinga) परळीच्या वैजनाथ मंदिरात (Parli Vaidyanath Temple) भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. रात्री 12 वाजेपासून या ठिकाणी दर्शन सुरू झाले. वैद्यनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रातील पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. श्रावण सोमवारनिमित्त या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भाविक या ठिकाणी येतात. 

त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात महापूजा : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. अशात राज्यभरातून भाविक या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झाली. पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त पहाटे मंदिरात महापूजा, अभिषेक, आरती करण्यात आलेत. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.