वाघाची शिकार करताना उंदीर तरी हाती लागला का? सुषमा अंधारेंची 'ऑपरेशन टायगर'वर टीका - SUSHMA ANDHARE ON UDAY SAMANT
🎬 Watch Now: Feature Video


Published : Feb 5, 2025, 8:16 PM IST
पुणे : शहरासह राज्यातील शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेक आमदार हे 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं होतं. आता याच ऑपरेशन टायगरवरून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, उदय सामंत यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या महत्त्वकांक्षा समोर आल्यानंतर आपण उघडं पडू नये यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रेम दाखवण्यासाठी ठाकरेंच्या पक्षातील १० आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार आहेत आणि आपण ऑपरेशन टायगर राबविणार असल्याचं सांगितलं. ऑपरेशन टायगरचं काय झालं? वाघाची शिकार करायला गेला आणि एखादा उंदीर तरी हाती लागला का? असा टोला यावेळी अंधारेंनी लगावला.