न्यायाधीश यशवंत वर्मा, नागपूर हिंसाचार प्रकरणावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम काय म्हणाले? पाहा व्हिडिओ - UJJWAL NIKAM
🎬 Watch Now: Feature Video


Published : March 23, 2025 at 10:43 PM IST
जळगाव : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांनंतर सर्वोच्च न्यायालयानं 22 मार्च 2025 रोजी एक अहवाल सार्वजनिक केला. सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीके उपाध्याय यांचा न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील अहवाल आणि यशवंत वर्मा यांनी केलेल्या बचावाचा अहवाल सार्वजनिक केला. या अहवालात दिल्ली पोलिसांनी दिलेले काही फोटो आणि व्हिडिओ देखील समाविष्ट आहेत. यात जळालेल्या नोटा दिसत आहेत. यावर आता ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली.
"आमच्या न्यायव्यवस्थेचा आत्मा हा पारदर्शकपणा आहे. न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याबाबत झालेला प्रकार हा सर्वोच्च न्यायालयानं वेबसाईटवर प्रसिद्ध केलाय. सर्वोच्च न्यायालयानं तीन सदस्य चौकशी समिती स्थापन केली. ही चौकशी समिती कार्य करेल. एखाद्या देशाची स्थिरता दोन गोष्टींवर टिकून असते. देशातील सामान्य नागरिकांचा त्या देशातील नाण्यावर विश्वास असला पाहिजे. तसंच सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असला पाहिजे," असं उज्ज्वल निकम म्हणाले. न्यायालयावरचा सामान्य माणसाचा विश्वास कमी झाला तर त्या देशात अराजकता येऊ शकते. आजही सामान्य माणसाच्या आशेचा किरण हा न्यायपालिका व न्यायव्यवस्था आहे, असंही ते म्हणाले.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान भरपाई ही आरोपींच्या मालमत्तेतून वसूल करण्याचा कायद्यात अधिकार आहे. न्यायालयाचेही तसे आदेश आहेत. काही उपद्वापींमुळे असे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्राच्या नावलौकिकाला कुठेही गालबोट लागता कामा नये, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणावर दिली.