मिरज शहरासह परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा, पहा व्हिडिओ - SANGLI RAIN NEWS
🎬 Watch Now: Feature Video


Published : March 25, 2025 at 10:37 PM IST
सांगली - मिरज शहरासह परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. प्रचंड वादळी वाऱ्यासह हा अवकाळी पाऊस बरसला. विजांच्या कडकडाटासह हा अवकाळी पाऊस मिरज शहराचा ग्रामीण भागात पडला आहे. प्रचंड वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरची झाडेदेखील ऊनमळून पडली आहेत. त्यामुळे वीज पुरवठादेखील खंडित झाला. तर काही घरांची पत्रेदेखील उडून गेली आहेत. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या अवकाळी पाऊसानं दिलासा मिळाला. मात्र, अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळदेखील उडाली. काही काळ जनजीवन विस्कळीतदेखील झालं. मिरज शहरामध्ये सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रचंड वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. तसेच वादळी वाऱ्यानंतर काही वेळातच विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. सुमारे 15 ते 20 मिनिटे मिरज शहरासह ग्रामीण भागामध्ये अवकाळी पाऊस पडला. तर वादळी वाऱ्यामुळे अनेक रस्त्यावरील असणारे झाड हे उन्मळून पडली आहेत. तर काही झाडे विद्युत तारावर पडली आहेत. त्यामुळे शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.