साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस; शिर्डीत भाविकांची मांदियाळी
🎬 Watch Now: Feature Video
शिर्डी : साईबाबांच्या शिर्डी दसरा उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं साई दर्शनासाठी भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी केली आहे. साईबाबांची पुण्यतिथी म्हणून तीन दिवस हा उत्सव शिर्डीत साईबाबा संस्थानच्या वतीनं साजरा करण्यात येतो. भाविकांची संभाव्य गर्दी पाहता यावर्षीही साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्यात आलंय. 15 ऑक्टोबर 1918 साली दसऱ्याच्या दिवशी साई बाबांनी समाधी घेतली. त्यामुळं बाबांचं स्मरण करताना लाखो भाविक साई समाधीवर नतमस्तक होतात. सलग तीन दिवस हा उत्सव साईबाबा संस्थानच्या वतीनं साजरा करण्यात येतो. यंदा मुंबईतील व्दारकामाई मित्र मंडळानं स्वखर्चानं साईबाबा मंदिराच्या 4 नंबर प्रवेशद्वारच्या आत साई बालाजी देखावा उभारला आहे. हा देखावा भाविकांचं लक्ष वेधून घेतोय. तसंच साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं भाविकांची मोठी मांदियाळी शिर्डीत पहायला मिळत आहे.