सरकारला बदनाम करणं हीच जरांगे पाटलांची भूमिका - राधाकृष्ण विखे पाटील - Vikhe Patil Criticized Sharad Pawar
Published : Aug 11, 2024, 6:57 PM IST
अहमदनगर Vikhe Patil Criticizes Sharad Pawar : "मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल मला काही बोलायचं नाही. मात्र त्यांनी आता भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अन्यथा हे केवळ सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान आहे. त्यात त्यांचा सहभाग आहे. असं म्हणता येईल," अशी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.
शरद पवार आरक्षणाबद्दल का बोलत नाहीत? : " रोहित पवार यांनी आजोबा शरद पवार यांना हा प्रश्न खरं तर विचारला पाहिजे. त्यांनी त्यांच्या हयातीत किती कुटुंब फोडले? किती कुटुंबांची धूळधाण केली? किती कुटुंबांना राजकीयदृष्ट्या संपवलं? याबाबत विचारायला पाहिजे. माझी पहिल्या दिवसापासून तीच मागणी आहे. चार वेळा मुख्यमंत्री झालेले पवार साहेब आरक्षणाबद्दल काही का बोलत नाहीत? कारण त्यांची भूमिका दुट्टपी आहे. लोकांना आपण किती काळ फसवणार आहात, असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला.