thumbnail

पुण्यात दुसऱ्या दिवशीही विसर्जन मिरवणूक सुरू, पहा ड्रोन व्हिडिओ - pune ganesh visarjan 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2024, 11:01 AM IST

पुणे Pune Ganesh Visarjan - पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होत आहे. "गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया"च्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप पुणेकर देत आहे. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजल्याच्या सुमारास सुरू झालेली पुण्याची विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे. मानाच्या गणेशोत्सव मंडळासह पुण्यातील महत्त्वाच्या गणेश मंडळाचे मंगळवारी विसर्जन झाले. बाकीच्या मंडळाच्या गणपती मूर्तीचे विसर्जन सुरू आहे.  दुसऱ्या दिवशीदेखील सकाळी सहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.  मोठ्या प्रमाणात यंदा गणेश भक्त विसर्जन मिरवणुकी सहभागी झालेले आहेत. दुसऱ्या दिवशी पुण्यात सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांचा उत्साह काय दिसून आला. पुणे शहर हे विद्येच माहेरघर असून पुणे शहराला संस्कृतीक राजधानीदेखील म्हटलं जाते. पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी जगभरातून नागरिक पुण्यात आले. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.