"ठाकरे आणि पवारांचे विधान...: पाहा ॲड. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले - Adv Prakash Ambedkar
Published : Aug 3, 2024, 11:25 AM IST
नांदेड Prakash Ambedkar: मनोज जरांगे पाटलांच्या मागणीमुळे गावागावांमध्ये २ गट निर्माण झाले आहेत. एक जरांगे पाटलांना पाठिंबा देतोय तर दुसरा ओबीसी गट मराठा समाजाच्या विरोधात आहे. जरांगेमुळे दोघांतील मतभेद टोकाला पोहोचला आहे.असा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केला. ते काल माळेगाव येथे आरक्षण बचाव यात्रेला संबोधित करताना बोलत होते. ते म्हणाले, आमच्या लक्षात आलं आहे की, काही जण त्याचा फायदा उचलत आहेत, ते या राजकीय भांडणाला सामाजिक वळण देण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. यामुळे आम्ही गावा-गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधत आहोत आणि तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. काही दिवसांपूर्वी शरद पवारांचं स्टेटमेंट आला आहे की, महाराष्ट्राचं मणिपूर होऊ देऊ नका. उद्धव ठाकरे यांची भूमिका हे नरेंद्र मोदींची भेट घेऊन जागा वाढवण्याची आहे. त्यांची अनेक वक्तव्य हे चिथावणीखोर आहेत,अशी टीका त्यांनी केली.