पिंपरी चिंचवड येथील प्राधिकरण भागात आलेला बिबट्या अडीच तासात जेरबंद; पाहा व्हिडिओ - PIMPRI CHINCHWAD LEOPARD
🎬 Watch Now: Feature Video


Published : Feb 2, 2025, 1:58 PM IST
|Updated : Feb 2, 2025, 6:50 PM IST
पिंपरी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात बिबट्या (Leopard in Pimpri Chinchwad) शिरला होता. शहरातील मुख्य नागरिक वस्ती परिसरात बिबट्या शिरल्यानं नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण (Leopard entered authority area of Pimpri Chinchwad) बघायला मिळत होतं. स्थानिक नागरिकांनी तत्काळ यासंदर्भातील माहिती वनविभागाला कळवली. त्यानंतर लगेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू टीम तेथे दाखल झाली. सोसायटी जवळ असलेल्या संत कबीर उद्यानातील एका पत्र्याच्या शेडच्या बाजूला बिबट्या लपून बसला होता. रेस्क्यू टीमनं सावधगिरी बाळगत दोन फायर करून त्यास बेशुद्ध केले. आज (2 फेब्रुवारी) सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यात रेस्क्यू टीमला यश आलं आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात असणाऱ्या प्राधिकरण भागात बिबट्याचा शिरकाव झाल्याची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगितलं जातंय.