thumbnail

दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर सत्ताधारी मंत्री अन् विरोधी पक्षनेत्यांची गळाभेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - Shambhuraj Desai Meet Ambadas Danve

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2024, 12:45 PM IST

पुणे Shambhuraj Desai Meet Ambadas Danve : सध्या गणेशोत्सव सुरू असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जगभरातील भाविक हे मोठ्या संख्येनं येत आहेत. जगभरातील भाविकांसह राजकीय, सामाजिक, तसंच सिने क्षेत्रातील भाविक देखील बाप्पाच्या दर्शनाला सध्या येताना दिसत आहेत. आज (13 सप्टेंबर) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर शिंदे गटाचे नेते, मंत्री शंभूराज देसाई आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे समोरा-समोर आले. यावेळी दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर हस्तांदोलन करत गळाभेटही घेतली. दरम्यान, शिवसेनेत पडलेल्या फूटीनंतर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. मात्र, आज शंभूराज देसाई आणि अंबादास दानवे यांनी गळाभेटी घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलंय.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.