बीड नगरपालिकेचा नगराध्यक्ष शिवसेना उबाठाचाच होणार गणेश वरेकर यांचा दावा - BEED MUNICIPALITY ELECTIONS
🎬 Watch Now: Feature Video

Published : October 9, 2025 at 4:41 PM IST
बीड - सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याच अनुषंगाने बीड नगरपालिका निवडणूक पार पाडणार आहे. प्रत्येक पक्ष नगरपालिकेवर दावा करत आहे. ठाकरे शिवसेनेनं देखील दावा केला आहे की येणारा नगरपालिकेचा अध्यक्ष हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असणार. शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी हा दावा केला आहे. आज शेकडो नागरिक संभाजीनगर येथे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे बीड नगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच झेंडा फडकणार असा दावा गणेश वरेकर यांनी केला आहे. शहरातील शिवसेना कार्यकर्तेही उत्साही आहेत. त्यांनीही अशा प्रकारे शहरात वातावरण तयार झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.