चारचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील अट्टल गुन्हेगार ‘नेपाळी’ जेरबंद - DHULE CRIME
🎬 Watch Now: Feature Video


Published : March 23, 2025 at 10:26 AM IST
धुळे : विविध गुन्हे दाखल असलेला आंतरराज्य गुन्हेगार अजय कटवाल उर्फ नेपाळी याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलं. पोलिसांनी नेपाळी याच्याकडून तीन लाख रुपये किमतीचं चारचाकी वाहन जप्त केलं आहे. नेपाळीविरुद्ध राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आंतरराज्यीय टोळीतील घरफोडी आणि चारचाकी वाहने चोरी करणार्या सराईत गुन्हेगाराला शिताफीनं जेरबंद केलं. पोलिसांनी अटक केलेल्या नेपाळीवर दोंडाईचा, नांदगाव पेठ, अंबरनाथ आणि उल्हासनगर पोलिसांत प्रत्येकी एक, मोहाडीनगर 2, चिपळून 3, विश्रामबाग 2, रामनगर, गाडगे नगर पोलीस ठाण्यांत 2 चोरी, घरफोडीचे गुन्हे तर, मध्यप्रदेश राज्यात चारचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली.