पुणे तिथं काय उणे; श्वावानाला घाबरून गाय चढली दुसऱ्या मजल्यावर - COW RESCUED IN PUNE
🎬 Watch Now: Feature Video


Published : May 17, 2025 at 1:04 PM IST
पुणे : 'पुणे तिथं काय उणे' ही म्हण नेहमी म्हणली जाते. या म्हणीची प्रचिती वेळोवेळी आपल्याला येत असते. शनिवारी पुण्यात एक अशीच घटना घडली. या घटनेची सध्या राज्यात जोरदार चर्चा होत आहे. पुण्यातील रविवार पेठ परिसरातील कापड गल्लीतील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चढून गाय गेल्याचा प्रकार समोर आला. भुंकणाऱ्या श्वानाला घाबरून गाय जिना चढून जुन्या वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचली. परंतु त्या गायीला परत जिन्यावरून खाली यायला जमत नव्हतं. म्हणून अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी क्रेनच्या सहाय्यानं त्या गायला सुखरूप इमारतीवरून खाली उतरवलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्यामागं श्वान भुंकत असल्यामुळं ती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चढली होती.