'ध' चा 'मा' करून विरोधकांनी घाणेरडं राजकारण करू नये : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ - RAHUL GANDHI SHIVAJI MAHARAJ TWEET
🎬 Watch Now: Feature Video


Published : Feb 19, 2025, 8:08 PM IST
मुंबई : "विरोधकांनी शिवाजी महाराजांना अभिवादन न करता राहुल गांधींविरोधात गरळ ओकण्याचा राजकीय कार्यक्रम केला आहे. त्यांची एक्स वरील पोस्ट हा काही शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी मूळ कार्यक्रम होऊ शकत नाही. सगळे कार्यक्रम सोडून विरोधक त्यांच्या पोस्टच्या मागे लागले आहेत. हा विरोधकांचा नेहमीचा खेळ आहे. पंडित जवाहरलाल नेहरुंबाबत देखील अशाच प्रकारे गरळ ओकण्याचं काम यापूर्वी झालं आहे. खरं तर, राहुल गांधींनी अभिवादन करताना 'हम्बल ट्रिब्युट' असा शब्द वापरला आहे. त्याचा अर्थ सन्मान करतो, अभिवादन करतो, असा होतो. हा भाषांतरामध्ये झालेला घोळ आहे, अभिवादन करतो, नमस्कार करतो, असा त्यांचा भाव आहे, 'ध' चा 'मा' करुन विरोधकांनी घाणेरडं राजकारण करु नये." अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.