ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेली शुभेच्छापत्रे सैनिकांना भेट, पहा व्हिडिओ - August Revolution Day
Published : Aug 9, 2024, 11:01 PM IST
मुंबई : 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त दादरमधील साने गुरुजी विद्यालयात विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी तयार केलेली शुभेच्छापत्रे भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी तटरक्षक दलाचे जवानही उपस्थित होते. सीमेच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस तैनात असलेल्या सैनिकांना विद्यार्थ्यांनी बनवलेली शुभेच्छापत्रे देऊन गौरविण्यात आलं. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हातानं शुभेच्छापत्रे तयार केली आहेत. यावेळी या कार्यक्रमाला महादेव गुरव, धर्मेंद्र यादव, विश्वजित काटे, कॅप्टन राकेश अग्रवाल, कॅप्टन अमेय कोचरेकर यांच्या उपस्थितीत सैनिकांना शुभेच्छापत्रे देण्यात आली. तसंच यावेळी दादर येथील साने गुरुजी विद्यालयाचे अध्यक्ष राजीव पाटील, ट्रस्टी अनिल पाटील, ट्रस्टी मधुरा अंतानी, सचिव मोहन मोहाडीकर, शालेय समिती सदस्य वैशाली वझे, शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा शिंदे तसंच उद्योजक शेफ तुषार देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.