अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन; आठवले, शिरसाट, सामंत काय म्हणाले? पाहा व्हिडिओ - MARATHI SANT SAHITYA SAMMELAN
🎬 Watch Now: Feature Video


Published : March 23, 2025 at 9:47 PM IST
शिर्डी (अहिल्यानगर) : अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन शिर्डीत दोन दिवस आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनाला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थिती होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. औरंगजेब हा क्रूर होता. अनेक वर्षांनंतर औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी होती. मात्र, औरंगजेबची कबर केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. ती कबर काढून चालणार नाही. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे ही माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.
नागपूरची दंगल सुनियोजित होती याचे पुरावे आता सापडतायेत. औरंगजेबाबद्दल प्रेम आहे असा एकही व्यक्ती अद्याप बोललेला नाही. औरंगजेबची कबर ठेवा म्हणून ते बोलत नाहीत. मात्र, महाविकास आघाडीला त्याचा पुळका आला असेल तर ती कबर उचलावी व त्यांच्या घरी ठेवावी, अशा शब्दात मंत्री संजय शिरसाठ यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुनावले. निवडणुकीच्या काळात मराठी भाषेवरुन राजकारण झालं. मराठी साहित्यावरुन राजकारण होतं. मात्र, आपल्याला जर मराठीवरील अन्याय रोखायचा असेल तर आपण मराठीत बोललं पाहीजे, असं मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केलं.