ETV Bharat / technology

रेडमी वॉच मूव्ह भारतात लॉंच, 140 हून अधिक वर्कआउट मोड्स, कमी किंमतीत अधिक फीचर - XIAOMI REDMI WATCH MOVE

शाओमीनं भारतात पहिलं स्थानिक निर्मित रेडमी वॉच मूव्ह लॉंच केलं. 1.85-इंच AMOLED डिस्प्ले, 14 दिवसांची बॅटरी आणि 140 हून अधिक वर्कआउट मोड्स आहे.

REDMI WATCH MOVE  रेडमी वॉच मूव्ह  XIAOMI LAUNCHES REDMI WATCH MOVE  REDMI WATCH MOVE PRICE
रेडमी वॉच मूव्ह (Xiaomi)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : April 21, 2025 at 2:33 PM IST

Updated : April 21, 2025 at 2:59 PM IST

2 Min Read

हैदराबाद : शाओमीनं सोमवारी (21 एप्रिल 2025) भारतात पहिली स्थानिक निर्मित स्मार्टवॉच, रेडमी वॉच मूव्ह, लॉंच केलंय. हे स्मार्टवॉच नोएडा येथील ऑप्टिमसच्या कारखान्यात बनवलं गेलं आहे. रेडमी वॉच मूव्हमध्ये 1.85-इंच 2.5D कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा ब्राइटनेस 600 निट्स आहे. ऑलवेज ऑन डिस्प्ले (AoD) सुविधा आहे. यात स्पिनिंग क्राउन आहे, जे वॉचमधील नेव्हिगेशन सुलभ करतं.

14 दिवसांची बॅटरी लाइफ
रेडमी वॉच मूव्ह IP68 रेटिंगसह धूळ आणि पाण्यापासून संरक्षित आहे. यात 140 हून अधिक वर्कआउट मोड्स आहेत, जे धावणे, कॅलरी ट्रॅकिंग, हृदय गती, SpO₂, तणाव, झोपेचं चक्र आणि मासिक पाळी ट्रॅकिंग यांचा मागोवा घेतात. शाओमीच्या मते,वॉच 14 दिवसांची बॅटरी लाइफ देतं, तर AoD सह 5 दिवस टिकतं.

किंमत
वॉचमध्ये शाओमीचा हायपरओएस वापरला आहे, जो नोट्स, टास्क, कॅलेंडर इव्हेंट्स आणि रिअल-टाइम हवामान अपडेट्स सिंक करतो. रेडमी वॉच मूव्ह ब्लूटूथ कॉलिंग आणि हिंदी भाषा सपोर्टसह येतो. रेडमी वॉच मूव्हची किंमत 1,999 रुपय आहे. ही वॉच ब्लॅक ड्रिफ्ट, ब्लू ब्लेझ, सिल्व्हर स्प्रिंट आणि गोल्ड रश रंगांमध्ये उपलब्ध असेल. या वॉचची विक्री 1 मे पासून Mi.com, फ्लिपकार्ट आणि शाओमी रिटेलवर सुरू होईल. प्री-बुकिंग 24 एप्रिलपासून सुरू होईल.

भारतात निर्मित वाच
शाओमी इंडियानं रेडमी वॉच मूव्ह हे भारतातील पहिलं स्थानिक निर्मित स्मार्टवॉच म्हणून सादर केलं आहे, जे दैनंदिन फिटनेस आणि वेलनेस ट्रॅकिंगसाठी डिझाइन केलं आहे. वॉचमध्ये आरामदायी डिझाइनसह अनेक स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत, जे भारतातील स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल आहे.

140 हून अधिक वर्कआउट मोड्स वॉचमध्ये 98.5% ट्रॅकिंग अचूकतेसह 140 हून अधिक वर्कआउट मोड्स आहेत, जे शाओमीच्या R&D द्वारे समर्थित आहेत. यात हृदय गती, SpO₂, तणाव, झोप (REM सह) आणि मासिक पाळी ट्रॅकिंग यासारख्या आरोग्य सुविधा आहेत.

“रेडमी वॉच मूव्ह भारतीय वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची वैशिष्ट्ये एकत्रित घेऊन आलं आहे. विश्वासार्ह कामगिरी, अचूक फिटनेस ट्रॅकिंग, प्रीमियम आरामदायी डिझाइन यात दिलं आहे. आमचं पहिलं स्थानिक निर्मित स्मार्टवॉच म्हणून, हे भारतीय बाजारपेठेसाठी विचारपूर्वक तयार केलेलं उत्पादन आहे.” - अनुज शर्मा, मुख्य विपणन अधिकारी, शाओमी इंडिया

प्री-बुकिंग 24 एप्रिलपासून सुरू
वॉचमध्ये TPU स्ट्रॅप आहे, जो दिवसभर आरामदायी वापरासाठी डिझाइन केला आहे. यात ब्लूटूथ कॉलिंग, हिंदी भाषा इंटरफेस आणि हायपरओएसद्वारे कम्युनिकेशन, टास्क मॅनेजमेंट आणि हवामान अपडेट्ससाठी उपयुक्त साधने आहेत. अल्ट्रा बॅटरी सेव्हर मोडसह बॅटरी लाइफ आणखी वाढवता येते. रेडमी वॉच मूव्ह 1 मे पासून Mi.com, फ्लिपकार्ट आणि शाओमी रिटेलवर चार रंगांमध्ये उपलब्ध असेल, आणि त्याची प्री-बुकिंग 24 एप्रिलपासून सुरू होईल.

हे वाचलंत का :

  1. 10G ब्रॉडबँड नेटवर्क लॉंच : आठ चित्रपट केवळ 72 सेकंदात डाउनलोड, जगातील सर्वात वेगवान इंटरनेट
  2. Oppo K13 5G भारतात स्नॅपड्रॅगन 6 Gen 4, 7000mAh बॅटरीसह लाँच, जाणून घ्या किंमत
    1. सीएमएफ फोन 2 प्रो 28 एप्रिलला धमका : एआय आधारित इसेंशियल स्पेस, मीडियाटेक प्रोसेसरसह ट्रिपल कॅमेरा

Last Updated : April 21, 2025 at 2:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.