हैदराबाद : चिनी तंत्रज्ञान कंपनी शाओमीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन, शाओमी 16, यावर्षी सप्टेंबरमध्ये लॉंच होण्याची शक्यता आहे. एका टिप्स्टरनं आता या स्मार्टफोनच्या डिस्प्ले आणि बॅटरीबाबत माहिती उघड केली आहे, जी यापूर्वीच्या लीकशी सुसंगत आहे. शाओमी 16 हा क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट 2 चिपसह लॉंच होणाऱ्या पहिल्या स्मार्टफोन्सपैकी एक असण्याची शक्यता आहे.
शाओमी 16 डिस्प्ले आणि बॅटरी तपशील (अपेक्षित):
टिप्स्टर डिजिटल चॅट स्टेशननं वेइबोवर लिहलंय की, शाओमी 16 मध्ये "6.3X" डिस्प्ले असेल. याचा अर्थ स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.31 इंच ते 6.39 इंच दरम्यान असू शकतो. यापूर्वी दुसऱ्या लीकमध्ये दावा करण्यात आला होता की शाओमी 16 मध्ये 6.32-इंच स्क्रीन असेल. शाओमी 15 च्या तुलनेत शाओमी 16 चा डिस्प्ले आकारात फारसा मोठा नसला, तरी टिप्स्टरनुसार या फोनमध्ये मोठी बॅटरी असेल. शाओमी 16 मध्ये 7,000mAh क्षमतेची बॅटरी असेल, जी सध्याच्या शाओमी 15 मधील 5,240mAh बॅटरीपेक्षा मोठी आहे. एप्रिलमधील आणखी एका लीकनं देखील या 7,000mAh बॅटरीचा दावा केला होता.
लॉंच आणि वैशिष्ट्ये (अपेक्षित)
सप्टेंबरमध्ये लॉंच होण्याची शक्यता असलेला शाओमी 16 हा स्नॅपड्रॅगन 8 एलिट 2 चिपसह येणारा पहिला स्मार्टफोन असू शकतो. क्वालकॉम देखील त्याच कालावधीत आपल्या स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपचा उत्तराधिकारी सादर करेल अशी अपेक्षा आहे. सध्याच्या शाओमी 15 फ्लॅगशिपच्या तुलनेत शाओमी 16 मध्ये काही सुधारणा अपेक्षित आहेत. शाओमी 15 मध्ये 6.36-इंच OLED स्क्रीन, स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिप, 50-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा सेटअप, 32-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि 5,240mAh बॅटरी आहे. शाओमी 16 बद्दल अधिक तपशील येत्या काही आठवड्यांत किंवा महिन्यांत ऑनलाइन समोर येण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का :