हैदराबाद WhatsApp Recruitment Scams : सोशल मीडिया तसंच मेसेजिंग प्लॅटफॉर्ममुळे अनेक तरुणांची नोकर भरतीच्या नावाखाली फसवणूक होत आहे. असे घोटाळे आता सामान्य झाले आहेत. व्हॉट्सॲपही अशा घोटाळ्यांना अपवाद नाहीय. व्हॉट्सॲपवर रिक्रूटमेंट स्कॅमर्स HR कर्मचारी असल्याचं आपल्याला दाखवतात. तसंच वापरकर्त्यांना वैयक्तिक तपशील शेअर करण्याची विनंती करतात. यासाठी पेमेंटची मागणी देखील केली जाते. तुम्हाला आमच्या कंपनीत चांगली नोकरीच्या संधी असल्याचं स्कॅमर्स सांगतात. त्यामुळं अनेकांची आर्थिक फसवणूक होते. या फसवणुकीला बळी पडण्यापासून तुम्ही स्वतः काय काळजी घ्यावी?, स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी फेक स्कॅमर्स कसे ओळखावे?, त्यांच्यापासू तुमच्या माहितीचं कसं संरक्षण करावं? चला जाणून घेऊया...
ऑफरची पडताळणी करा : तुम्हाला व्हॉट्सॲपवर नोकरीची ऑफर मिळाल्यास, नेहमी भर्ती करणाऱ्याची क्रेडेन्शियल्स पुन्हा एकदा तपासा. अधिकृत संपर्क तपशील पहा, जसं की कंपनी डोमेन किंवा LinkedIn प्रोफाइलवरून ईमेल करावा. कारण वैध कंपन्या क्वचितच मेसेजिंग ॲप्सद्वारे नियुक्तीची प्रक्रिया सुरू करतात.
शुल्क मागितल्यास सावध रहा : तुमचा अर्ज, व्हिसा किंवा प्रशिक्षणावर प्रक्रिया करण्यासाठी रिक्रूटरनं तुम्हाला आगाऊ शुल्क मागितल्यास सावध रहा. वैध कंपन्या अर्जदारांकडून पैशाची मागणी करत नाहीत. याव्यतिरिक्त तुम्ही स्कॅमर्सच्या भाषेवरून त्याला ओळखू शकता. तुम्हाला काहीच समजत नसल्यास तुमच्या मित्राची मदत घ्या.
कंपनीची माहिती घ्या : कोणतीही ऑफर स्विकारण्यापूर्वी कंपनीची माहिती घ्या. संबंधिक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. जॉबची ऑफर तुम्हाला WhatsApp वर आलेल्या गोष्टींशी जुळते का?, ते तपासा. स्कॅमर्स सहसा किंचित बदललेली नावं किंवा बनावट प्रोफाइल असलेल्या वास्तविक कंपन्यांची तोतयागिरी करतात.
वैयक्तिक माहिती शेअर करणं टाळा : तुमची बँक खाते तपशील, आधार कार्ड, पॅन कार्ड, महत्वाची कागदपत्रांच्या प्रती यासारखी संवेदनशील माहिती कधीही WhatsApp द्वारे शेअर करू नका. स्कॅमर्स तुम्ही दिलेली सर्व माहिती चोरी किंवा आर्थिक फसवणुकीसाठी वापरू शकतात.
संशयास्पद गोष्टीची तक्रार करा : तुम्हाला फसवणुकीचा संशय असल्यास, व्हाट्सएपवर स्कॅमर्सला त्वरित ब्लॉक करा. याव्यतिरिक्त, इतरांना बळी पडण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही स्थानिक पोलिसांना किंवा कंपनीच्या अधिकाऱ्यांना स्कॅमर्सनं तोतयागिरी केल्याबद्दल तक्रार करा.
डिजिटल माध्यामांच्या जगात आज तुम्हाला जागरूक राहण्याची गरज आहे. अन्याथा तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. तुम्ही काळजी घेतल्यास स्कॅमर्सपासून स्वतःचं संरक्षण करू शकता. मात्र, तुम्ही काळजी न घेतल्यास तुमच्या कागदपत्राचा वापर करून स्कॅमर्स मोठा गुन्हा करू शकतात. त्यामुळं तुम्हाला तुरुंगावासही होऊ शकतो.
हे वाचलंत का :