हैदराबाद : फोक्सवॅगननं भारतात आपली प्रीमियम SUV, Tiguan R Line, लाँच केली आहे. या स्पोर्टी SUV ची सुरुवातीची किंमत 48.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तिसऱ्या पिढीच्या या SUV मध्ये आकर्षक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि शक्तिशाली कामगिरीचा समावेश आहे. ही गाडी पूर्णपणे आयात (CBU) स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध असेल आणि ती यापूर्वी बंद झालेल्या दुसऱ्या पिढीच्या टिग्वानची उत्तराधिकारी आहे.
Beyond smootheR.
— Volkswagen India (@volkswagenindia) April 14, 2025
Beyond smarteR.
Beyond boldeR.
Beyond safeR.
Beyond comfieR.
Beyond brighteR.
The new Tiguan R-Line.
Beyond betteR.
Introductory price of ₹48.99 Lakh*. Explore now.#beyondbetteR #TiguanRLine #VolkswagenIndia #Volkswagen pic.twitter.com/KzMIzD8XAC
Volkswagen Tiguan R Line डिझाइन
टिग्वान आर-लाइनमध्ये स्पोर्टी आणि आक्रमक डिझाइन आहे. यात आकर्षक फ्रंट आणि रिअर बंपर, रिअर स्पॉयलर, साइड पॅनल्स आणि नवीन हेडलाइट्स यांचा समावेश आहे, जे LED लाइट स्ट्रिपनं जोडलेले आहेत. याशिवाय, 19-इंची ॲलॉय व्हील्स आणि मागील मॉडेलपेक्षा 30 मिमी जास्त लांबी यामुळं गाडी अधिक प्रभावी दिसतं. ही SUV पर्सिमन रेड मेटॅलिक, सिप्रेसिनो ग्रीन मेटॅलिक, नाइटशेड ब्लू मेटॅलिक, ग्रेनाडिला ब्लॅक मेटॅलिक, ओरिक्स व्हाइट मॉदर ऑफ पर्ल इफेक्ट आणि ऑयस्टर सिल्व्हर मेटॅलिक या रंगांमध्ये उपलब्ध आहे. गाडीच्या फ्रंट ग्रिल आणि टेलगेटवर विशेष "आर" बॅज आहे.

Volkswagen Tiguan R Line इंटीरियर आणि फीचर्स
गाडीच्या आतील बाजूस काळ्या रंगाचे इंटीरियर आणि स्पोर्ट्स सीट्स आहेत, ज्यावर आर-लाइन बॅज आहे. यात 15-इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले सपोर्टसह), 10.25-इंची डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हेड्स-अप डिस्प्ले, ड्राइव्ह सेलेक्टर स्विच, आठ-स्पीकर ऑडिओ सिस्टम, ॲम्बियंट लाइटिंग आणि मसाजिंग सीट्स यासारखी वैशिष्ट्ये आहेत.

Volkswagen Tiguan R Line सुरक्षा
या SUV मध्ये नऊ एअरबॅग्ज, हिल स्टार्ट असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक्स यांसह 21 लेव्हल 2 ADAS फीचर्स जसे की साइड असिस्ट, फ्रंट असिस्ट, लेन असिस्ट, पार्क असिस्ट प्लस आणि ॲडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांचा समावेश आहे. याला युरो NCAP चे फाइव्ह-स्टार रेटिंग देखील मिळालं आहे.

टिग्वान आर-लाइन पॉवरट्रेन
टिग्वान आर-लाइनमध्ये 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे, जे 201 अश्वशक्ती आणि 320 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टमसह जोडलेले आहे. याशिवाय, डायनॅमिक चेसिस कंट्रोल प्रो ॲडॅप्टिव्ह सस्पेंशन सिस्टममुळं ड्रायव्हर कम्फर्ट आणि स्पोर्ट मोड्समध्ये डॅम्पिंग समायोजित करू शकतो.
हे वाचलंत का :