हैदराबाद : Vivo स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Vivo लवकरच आपल्या चाहत्यांसाठी Vivo X200 मालिका भारतासह जागतिक बाजारपेठेत लॉंच करणार आहे. कंपनीनं ही स्मार्टफोन सीरिज आपल्या होम मार्केटमध्ये गेल्या महिन्यात लॉंच केली होती. कंपनीनं या सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन सादर केले होते. ही मालिका आधीच चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. काही दिवसातचं ही मालिका भारतातही लॉंच होणारआहे. या मालिकेत Vivo X200, X200 Pro, आणि X200 Mini लॉंच होण्याची शक्यता आहे.
Vivo X200
— Anvin (@ZionsAnvin) November 12, 2024
- 16GB+512GB
- Colors: Aurora Green | Midnight Black
Key features:
- ZEISS Telephoto Camera
- IP68 & IP69 Dust and Water Resistance
- 5,800mAh BlueVolt Battery
- 90W FlashCharge
- Dimensity 9400
- Vivo V2 Chip
===================================
Vivo X200 Pro
-… pic.twitter.com/3e9krNOGcQ
Vivo चे तीन स्मार्टफोन लॉंच : कंपनीनं आपल्या होम मार्केटमध्ये Vivo X200 सीरीजचे तीन प्रकार लॉंच केले आहेत. पण, मलेशियाने सादर केलेल्या टीझरमध्ये दोनच प्रकार समोर आले आहे. यात Vivo X200 आणि Vivo X200 Pro ची झलक पहायला मिळतेय. त्यामुळं कंपनी भारतीय स्मार्टफोन बाजारात या मालिकेतील तिन्ही मॉडेल्स लॉंच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Vivo X200 मालिका काही दिवसांपूर्वी चीनमध्ये लॉंच करण्यात आली होती. कंपनी या मालिकेतील तीन मॉडेल्स लॉंच करण्याचा विचार करत आहे. डिसेंबरच्या अखेरीस ही मालिका भारतात लॉंच होण्याची शक्यता आहे. यात मोठी बॅटरी आणि पॉवरफुल प्रोसेसर अशी वैशिष्ट्ये असतील.
डिस्प्ले आणि प्रोसेसर : Vivo X200 मालिकेत X200, X200 Pro आणि X200 Pro Mini, X200 आणि X200 Pro मध्ये उत्कृष्ट OLED डिस्प्ले आहेत, X200 मध्ये 6.67-इंच स्क्रीन आहे आणि X200 Pro मध्ये 6.78 इंचांची स्क्रीन आहे. दोन्ही फोनचा डिस्प्ले 120Hz ESH दर आणि 1.5K रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. डिस्प्ले 4500 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
200MP Zeiss APO टेलिफोटो कॅमेरा : X200 मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS), 50MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP टेलिफोटो लेन्ससह 50MP Sony IMX921 मुख्य कॅमेरा आहे. X200 Pro मध्ये 50MP LYT-818 मुख्य सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 200MP Zeiss APO टेलिफोटो कॅमेरा आहे. दोन्ही फोनमध्ये सेल्फीसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. X200 मध्ये 5,800mAh बॅटरी आहे, तर X200 Pro मध्ये 6,000mAh बॅटरी आहे. दोन्ही 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.
X200 Pro Mini ची वैशिष्ट्ये : X200 Pro Mini मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.3-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. यात डायमेन्सिटी 9400 चिपसेट आहे. यामध्ये 50MP LYT818 मुख्य सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 100x पर्यंत डिजिटल झूम असलेली 50MP पेरिस्कोप लेन्ससह कॅमेरा सिस्टम समाविष्ट आहे. यात 5,700mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी त्यांना IP68 आणि IP69 रेट केलं आहे.
रंग : Vivo X200 आणि X200 Pro टायटॅनियम, सॅफायर ब्लू, नाईट ब्लॅक आणि व्हाइट मूनलाइट रंगांमध्ये येतात. त्याच वेळी, नवीन मिनी प्रकार टायटॅनियम ब्लू, मायक्रो पावडर (गुलाबी) आणि स्ट्रेट फॉरवर्ड (पांढरा) रंगात मिळण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का :