हैदराबाद : विवो लवकरच चीनमध्ये विवो एक्स फोल्ड 5 हा फोल्डेबल स्मार्टफोन लॉंच करून सॅमसंगशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे. या फोनच्या भारतातील लॉन्चिंगबाबतही चर्चा सुरू आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटनं सुसज्ज आहे. कंपनीच्या टीझरनुसार, हा स्मार्टफोन फक्त 209 ग्रॅम वजनाचा आहे. याशिवाय, विवो एक्स-फोल्ड 5 मध्ये 6.56 इंचांचा एलटीपीओ अॅमोलेड कव्हर डिस्प्ले आहे, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो.
Vivo X Fold 5 ची वैशिष्ट्ये
विवो एक्स फोल्ड 5 हा जगातील सर्वात हलका आणि पातळ फोल्डेबल फोनपैकी एक आहे. हा फोन फोल्ड केल्यावर 9.33 मिमी आणि उघडल्यावर 4.3 मिमी जाडीचा आहे. याचं वजन 209 ग्रॅम आहे, जे विवो एक्स फोल्ड 3 (219ग्रॅम) आणि एक्स-फोल्ड 3 प्रो (236ग्रॅम) पेक्षा कमी आहे. यामुळं हा फोन ओप्पो फाइंड एन5 शी स्पर्धा करू शकतो. मात्र, हो फोन त्याच्यापेक्षा थोडा जाड आहे. यात 8.03 इंचांचा अंतर्गत अॅमोलेड डिस्प्ले आहे, जो 2के+ रिझोल्यूशन आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. याशिवाय, यात 6,000 एमएएचची बॅटरी आहे, जी फोल्डेबल फोनमधील सर्वात मोठी बॅटरी आहे. हा फोन 90 वॅट वायर्ड आणि 30 वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
Vivo X Fold 5 कॅमेरा
विवो एक्स-फोल्ड 5 मध्ये कॅमेरा सेटअपही आहे. यात 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे, जो अंतर्गत आणि बाह्य दोन्ही स्क्रीनवर वापरता येतो. मागील कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स931 प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स882 पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स (3x ऑप्टिकल झूमसह), आणि 50 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स921अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे.
Vivo X Fold 5 भारतातील लॉंचिग
विवोनं यापूर्वी भारतात फक्त हाय-एंड एक्स-फोल्ड 3 प्रो लॉंच केला होता, ज्याची किंमत 1,59,999 रुपये होती. मात्र, एक्स-फोल्ड 3 भारतात लॉंच झाला नव्हता. आता अशी माहिती आहे की, विवो एक्स फोल्ड 5 आणि विवो एक्स200 एफई 10 जुलै रोजी भारतात लॉंच होऊ शकतात. स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटमुळं हा फोन परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होऊ शकतो, ज्यामुळं तो सॅमसंगसारख्या ब्रँड्सशी स्पर्धा करू शकेल.
हे वाचलंत का :