हैदराबाद : व्हिवो, या जागतिक स्मार्टफोन ब्रँडनं आज आपल्या स्टायलिश V सिरीजमध्ये नवीन स्मार्टफोन व्हिवो V50e लॉंच केलाय. प्रगत पोर्ट्रेट वैशिष्ट्ये आणि आलिशान डिझाइन यांचा संगम असलेला हा V50e स्मार्टफोन Sony Multifocal Pro Portrait कॅमेरा सिस्टम आणि 50 MP Eye-AF ग्रुप सेल्फी कॅमेऱ्यानं सुसज्ज आहे. इमर्सिव्ह इन्फिनिटी व्ह्यूइंग अनुभव देण्यासाठी हा स्मार्टफोन अल्ट्रा-स्लिम क्वाड-कर्व्ड डिस्प्ले आणि फक्त 0.739 सेमी मापाच्या स्लिम बॉडीसह येतो. स्थानिक ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्यांना लक्षात घेऊन व्हिवोनं V50e दोन आकर्षक रंगांमध्ये सादर केला आहे. यात Sapphire Blue आणि Pearl White रंगाचा समावेश आहे,
Check out the new vivo V50e. Luxury never looked better and now you can own it with exclusive offers.
— vivo India (@Vivo_India) April 10, 2025
Prebook Now https://t.co/iiBfuyz1EB#vivoV50e #PortraitSoPro pic.twitter.com/cPFlx37DLA
व्हिवो V50e ची किंमत आणि उपलब्धता
8 GB + 128 GB व्हेरिएंटसाठी 28,999 रुपये.
8 GB + 256 GB व्हेरिएंटसाठी 30,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
हा स्मार्टफोन 17 एप्रिलपासून व्हिवोच्या अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि सर्व भागीदार रिटेल स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. ग्राहक आजपासून व्हिवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आणि भागीदार रिटेल स्टोअरवर V50e प्री-बुक करू शकतात.
The vivo V50e brings elegance and immersion together in a form so sleek, all you feel is the moment.
— vivo India (@Vivo_India) April 9, 2025
Know more https://t.co/TfvlN6iy20#vivoV50e #PortraitSoPro pic.twitter.com/MFbw4BCyMy
ऑनलाइन ऑफर्स
HDFC बँक आणि SBI कार्ड व्यवहारांवर 10% पर्यंत ग्राहकांना झटपट सवलत मिळेल. जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 10% पर्यंत एक्सचेंज बोनस 6 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. व्हिवो V50e च्या खरेदीवर व्हिवो TWS इयरबड्स फक्त 1,499 रुपयांत मिळेल.
The vivo V50e brings elegance and immersion together in a form so sleek, all you feel is the moment.
— vivo India (@Vivo_India) April 9, 2025
Know more https://t.co/TfvlN6iy20#vivoV50e #PortraitSoPro pic.twitter.com/MFbw4BCyMy
ऑफलाइन ऑफर्स
SBI, HSBC, Amex, DBS, IDFC, Kotak आणि इतर बँकांसह 10% पर्यंत झटपट बँक कॅशबॅक मिळेल. 9 महिन्यांचा झीरो डाउन पेमेंट फायनान्स पर्याय देखील उपलब्ध आहे. व्हिवो V-शील्ड स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन प्लॅनवर 40% पर्यंत सवलत आहे. “Servify” आणि “Cashify” द्वारे 10% पर्यंत एक्सचेंज बोनस मिळेल.
प्रकाशासोबत बदलणारा फोन
व्हिवो V50e स्मार्टफोन Sapphire Blue व्हेरिएंटमध्ये प्रत्येक फोनचा पॅटर्न वेगळा आहे, जो रत्नांसारखा चमक आणि खनिज टेक्सचर प्रदान करतो. Pearl White व्हेरिएंट प्रकाशासोबत बदलणारा पाण्यासारखा प्रभाव आणि मोत्यांची चमक दर्शवतो. 0.739 सेमी स्लिम प्रोफाइल आणि 17.19 सेमी (6.77 इंच) अल्ट्रा-स्लिम क्वाड-कर्व्ड डिस्प्लेसह, V50e इमर्सिव्ह व्ह्यूइंग अनुभव देतो.
पोर्ट्रेट फोटोग्राफीचा अनुभव
व्हिवो V50e मध्ये शक्तिशाली कॅमेरा सेटअप आहे. Sony IMX882 सेन्सरसह OIS कमी प्रकाशातही उच्च-गुणवत्तेची स्थिर प्रतिमा सुनिश्चित करतो. Sony Multifocal Pro Portrait 1x (26mm), 1.5x (39mm), आणि 2x (52mm) असे तीन फोकल लांबीचे पर्याय देतो. 50 MP Eye-AF ग्रुप सेल्फी कॅमेरा 92-डिग्री वाइड फील्डसह येतो. याशिवाय, भारतासाठी खास Wedding Portrait Studio फीचर सिनेमॅटिक वेडिंग तयार करतो.
IP68 आणि IP69 रेटिंग
IP68 आणि IP69 रेटिंगसह, V50e धूळ आणि पाण्यापासून संरक्षित आहे. फोन1.5 मीटर खोलीपर्यंत 30 मिनिटे पाण्यात राहू शकतो. Diamond Shield Glass आणि Comprehensive Cushioning Structure मुळं ड्रॉप प्रोटेक्शन 50% वाढतं.
V50e बॅटरी
V50e मध्ये 5600 mAh बॅटरी आणि 90W फ्लॅशचार्जसह येतो, यात मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर आणि 8 GB RAM + 8 GB एक्सटेंडेड RAM मुळे मल्टिटास्किंग सुलभ होतं.
स्मार्ट AI वैशिष्ट्यांसह सॉफ्टवेअर
FunTouch OS 15 (Android 15 वर आधारित) आणि AI वैशिष्ट्ये यात आहे. AI Image Expander, Live Call Translation, आणि AI Eraser 2.0 यामुळे वापरकर्त्यांचा अनुभव समृद्ध होतो. व्हिवो V50e हा भारतात ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ग्रेटर नोएडामध्ये तयार करण्यात आलेला फोन आहे.
हे वाचलंत का :