हैदराबाद : व्हिवो T4 5G 22 एप्रिल 2025 रोजी भारतात लाँच होणार आहे! व्हिवो_इंडियाच्या इन्स्टाग्राम पेजवर याची पुष्टी झाली आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल, ज्यामध्ये स्नॅपड्रॅगन 7s जेन 3 चिपसेट, 7300mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंगसह येणार आहे. गेमिंग आणि मल्टिटास्किंगसाठी हा फोन एक शानदार पर्याय असेल! व्हिवो T4 5G, 22 एप्रिल लाँच, फ्लिपकार्ट, स्नॅपड्रॅगन 7s जेन 3, 7300mAh बॅटरी, 90W चार्जिंग, गेमिंग फोन.
#GetSetTurbo and multitask in the blink of an eye with the new #vivoT4, coming in hot on 22nd April! #TurboLife is within your reach.
— vivo India (@Vivo_India) April 14, 2025
Know More - https://t.co/O732aX97oE#vivoT4 #GetSetTurbo #TurboLife #ComingSoon pic.twitter.com/pD5CV9CpnY
व्हिवो T4 5G ची किती असेल किंमत
व्हिवो लवकरच भारतात त्यांचा नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे, जो व्हिवो T4 5G असेल. याची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. कंपनीनं अधिकृत माहिती त्यांच्या X खात्यावर जाहीर केली आहे. मात्र, लॉंचपूर्वीच फोनचे अनेक फीचर लीकमुळं समोल आले आहेत. हा फोन स्नॅपड्रॅगन 7s जेन 3 चिपसेटनं सुसज्ज असू शकतो आणि तीन स्टोरेज पर्यायांसह येईल. चला, या फोनबद्दल आतापर्यंत काय माहिती आहे ते पाहूया!
व्हिवो T4 5G ची अपेक्षित वैशिष्ट्ये
डिझाइन आणि डिस्प्ले
फोनवर मोठा गोलाकार रियर कॅमेरा मॉड्यूल असू शकतो. हा फोन एमराल्ड ब्लेझ आणि फँटम ग्रे या दोन रंगांमध्ये येईल. यात 6.67-इंच FHD+ क्वाड-कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट देईल.
परफॉर्मन्स
स्नॅपड्रॅगन 7s जेन 3 चिपसेट आणि Android 15 आधारित FunTouchOS 15 सह हा फोन येईल. यात तीन स्टोरेज पर्याय असतील 8GB रॅम + 128GB, 8GB रॅम + 256GB आणि 12GB रॅम + 256GB. याशिवाय, IR ब्लास्टर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसारखी फीचर्सही असतील.
कॅमेरा
व्हिवो T4 5G मध्ये OIS सह 50-मेगापिक्सेल Sony IMX882 प्रायमरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल सेकंडरी लेन्स असू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
बॅटरी
फोनमध्ये 7,300mAh ची दमदार बॅटरी असेल, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
व्हिवो T4 लाँच टाइमलाइन
कंपनीनं लाँचची तारीख जाहीर केली असून व्हिवो T4 5G 21 एप्रिल रोजी भारतात लॉंच होईल. फ्लिपकार्टवर यासाठी खास मायक्रोसाइट आधीच लाइव्ह आहे.
हे वाचलंत का :