हैदराबाद : 12 एप्रिल 2025, शनिवारी भारतभरातील अनेक वापरकर्त्यांसाठी डिजिटल पेमेंट्स ठप्प झालं, कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मध्ये तांत्रिक समस्या आल्या. Paytm, PhonePe आणि Google Pay सारख्या लोकप्रिय ॲप्सनी काम करणे बंद केल्याची तक्रार अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर आणि आउटेज-ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मवर नोंदवली. या समस्येमुळं किराणा खरेदी, बिल पेमेंट्स आणि फंड ट्रान्सफरसाठी UPI वर अवलंबून असलेल्या अनेकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, तर आउटेज मॉनिटरिंग वेबसाइट्सवर याची रिअल-टाइम नोंद झाली.
NPCI is currently facing intermittent technical issues, leading to partial UPI transaction declines. We are working to resolve the issue, and will keep you updated.
— NPCI (@NPCI_NPCI) April 12, 2025
We regret the inconvenience caused.
NPCI ची एक्सवर पोस्ट
NPCI नं X वर म्हटलं, “NPCI ला तांत्रिक समस्यांमुळं UPI मध्ये अडचण निर्माण झाली आहे. या समस्येवर आम्ही काम करत आहोत. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो.”
Downdetector वर तक्रारींमध्ये वाढ
ऑनलाइन सेवा समस्यांचा मागोवा घेणाऱ्या Downdetector या प्लॅटफॉर्मवर तक्रारींमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली. साइटनुसार, दुपारी 12:00 वाजण्याच्या सुमारास तक्रारींची संख्या 1,200 पेक्षा जास्त झाली. सुमारे 66 टक्के वापरकर्त्यांनी पेमेंट्स करण्यात अडचणी असल्याचे सांगितले, तर 34 टक्के वापरकर्त्यांनी फंड ट्रान्सफरमध्ये समस्यांचा उल्लेख केला. विविध बँका आणि प्लॅटफॉर्म्सवरील वापरकर्त्यांना याचा फटका बसला, ज्यामुळे UPI इन्फ्रास्ट्रक्चरमधील व्यापक नेटवर्क समस्येकडं लक्ष वेधलं गेलं.
UPI म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व
UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे विकसित केलेली एक लोकप्रिय इन्स्टंट पेमेंट सिस्टम आहे, जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली कार्यरत आहे. याच्या माध्यमातून वापरकर्ते मोबाइल ॲप्सद्वारे बँक खात्यांमध्ये त्वरित पैसे हस्तांतरित करू शकतात, तेही NPCI कडून कोणतंही शुल्क न आकारता. किराणा बिलांपासून ते मोठ्या फंड ट्रान्सफरपर्यंत UPI चा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय, AutoPay वैशिष्ट्याद्वारे बिल पेमेंट्स, सबस्क्रिप्शन्स आणि इतर पुनरावृत्ती पेमेंट्स स्वयंचलित करण्याची सुविधाही UPI देतं.
खंडाचे कारण अद्याप अस्पष्ट
या आउटेजमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, परंतु वापरकर्त्यांना लवकरात लवकर निराकरणाची अपेक्षा आहे. NPCI किंवा प्रमुख UPI प्लॅटफॉर्म्सकडून अद्याप कारण किंवा निराकरणाच्या वेळेबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी झालेलं नाही. जोपर्यंत सेवा पूर्णपणे पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत वापरकर्त्यांना डेबिट/क्रेडिट कार्ड्स किंवा रोख रक्कम यांसारखे पर्यायी पेमेंट पद्धती वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
हे वाचलंत का :