हैदराबाद : एप्रिल 2025 चा हा आठवडा स्मार्टफोन चाहत्यांसाठी खास आहे, कारण भारतात अनेक शानदार डिव्हाइसेस लाँच होत आहेत. मोटोरोला एज 60 स्टायलस (15 एप्रिल), ज्यामध्ये 6.7-इंच pOLED डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 7s जेन 2 आहे. रेडमी A5 (15 एप्रिल) 10,000 रुपयांखालील बजेट सेगमेंटमध्ये 6.88-इंच डिस्प्ले आणि 5200mAh बॅटरीसह येतो. Acer स्मार्टफोन (15 एप्रिल) बाजारात नवीन प्रवेश करतो.सॅमसंग गॅलेक्सी M56 5G (17 एप्रिल) सर्वात पातळ डिझाइन आणि 50MP कॅमेरासह लक्ष वेधतो. इनफिनिक्स नोट 50s 5G+ (18 एप्रिल) 144Hz AMOLED आणि सेंट टेक्नॉलॉजी ऑफर करतो. ओप्पो K13 5G (21 एप्रिल) आणि व्हिवो T4 5G (22 एप्रिल) 7000mAh+ बॅटरीसह गेमिंगसाठी सज्ज आहेत. याच आगामी फोन बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत..
Introducing the Motorola edge 60 STYLUS
— Motorola India (@motorolaindia) April 10, 2025
- flex your creativity and flaunt your stylus!Effortlessly creative and precise, just like you!
#motoedge60STYLUS #motorola
Motorola Edge 60 Stylus (मोटोरोला एज 60 स्टायलस)
मोटोरोला उद्या भारतात आपला नवीन एज 60 मालिकेतील स्मार्टफोन, मोटोरोला एज 60 स्टायलस लॉंच करणार आहे. एज मालिकेतील हा पहिला फोन आहे ज्यामध्ये स्टायलस सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय, मोटोरोला मोटो बुक 60 नावाचे इंटेल-प्रोसेसरयुक्त लॅपटॉप 17 एप्रिल रोजी सादर करणार आहे. दोन्ही उत्पादनं मध्यम-श्रेणीच्या बाजारपेठेत लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज आहेत.
pOLED पंच होल डिस्प्ले
मोटोरोला एज 60 स्टायलस मध्ये 6.7 इंच 1.5K pOLED पंच होल डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आणि पीक ब्राइटनेस 3,000 निट्स आहे. याला कॉर्निंग गोरिला ग्लास 3 चं संरक्षण आहे. स्टायलसच्या मदतीनं चित्र, स्केचिंग आणि लेखन करता येईल. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे, जी 68 W फास्ट चार्जर आणि 15 W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 प्रोसेसर
या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 प्रोसेसर, 8 GB रॅम आणि 256 GB UFS 2.2 स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1 TB पर्यंत वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 15 वर चालतो आणि 2 वर्षांचे ओएस अपडेट्स तसंच 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील.
50 MP मुख्य कॅमेरा
कॅमेरा सेटअपमध्ये 50 MP मुख्य Sony Lyt 700C सेन्सर, 13 MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 32 MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनला IP68 रेटिंग आणि मिलिटरी स्टँडर्ड टिकाऊपणा आहे. यात पॅन्टोन-प्रमाणित सर्फ द वेब आणि जिब्राल्टर सी रंग उपलब्ध असतील. याशिवाय, Dolby Atmos सपोर्टसह स्टीरिओ स्पीकर्स आहेत. मोटोरोला एज 60 स्टायलस फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल आणि मध्यम-श्रेणीच्या किंमतीत येण्याची अपेक्षा आहे.
Acer (एसर)
Acer भारतीय बाजारपेठेत टीव्हीनंतर आता स्मार्टफोनच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. कंपनीनं Amazon वर आपल्या आगामी स्मार्टफोनबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे, कारण हे डिव्हाइस फक्त या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. यापूर्वी हे स्मार्टफोन 25 मार्च 2025 रोजी लॉंच होणार होते, परंतु काही कारणास्तवर त्यांचं लॉंचिग पुढं ढकलण्यात आलं. आता Amazon नं आपल्या वेबसाइटवर एक समर्पित लँडिंग पेज तयार केलं आहे, ज्यावर Acer स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनुसार, Acerpure Acerone Liquid S162E4 आणि Acerone Liquid S272E4 हे दोन मॉडेल्स लॉंच होण्याची शक्यता आहे.
Acer Super ZX & ZX Pro are the upcoming smartphones from Acer. Launching in India on 15th April. pic.twitter.com/0bnSmFfd7q
— Sudhanshu Ambhore (@Sudhanshu1414) April 13, 2025
Amazonवर खास लॅंडिंग पेज
Amazon नं आपल्या वेबसाइटवर एक खास लँडिंग पेज तयार केलं आहे, ज्यामध्ये नवीन Acer स्मार्टफोनच्या आगमनाची माहिती देण्यात आली आहे. या पेजवर कंपनीनं फोनच्या मोठ्या कॅमेरा मॉड्यूलचा उल्लेख केला आहे आणि 'Next Horizon' ही टॅगलाइन वापरली आहे. हे स्मार्टफोन 15 एप्रिल 2025 रोजी भारतीय बाजारपेठेत लॉंच होणार आहेत.
Acer Acerone Liquid S162E4
Acerpure च्या लिस्टिंगनुसार, Acerone Liquid S162E4 मध्ये 6.5-इंच HD+ (720 x 1,600 पिक्सल) LCD डिस्प्ले आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण आहे. तर Acerone Liquid S272E4 मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे. प्रोसेसरबाबत बोलायचं झालं तर, Liquid S162E4 मध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर आहे, तर Liquid S272E4 मध्ये कदाचित याच प्रोसेसरची सुधारित आवृत्ती असण्याची शक्यता आहे. दोन्ही फोन Android 14 वर चालतील.
डिव्हाइसमध्ये 5,000mAh बॅटरी
कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचं तर, Liquid S162E4 मध्ये 16MP प्राइमरी रियर सेंसर आणि 0.08MP सेकंडरी सेंसर आहे, तर Liquid S272E4 मध्ये 20MP मुख्य सेंसर आणि 0.3MP सेकंडरी सेंसर आहे. दोन्ही फोनमध्ये 5MP सेल्फी कॅमेरा आहे. स्टोरेजच्या बाबतीत, दोन्ही फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेज मिळेल. याशिवाय, दोन्ही डिव्हाइसमध्ये 5,000mAh बॅटरी आहे.
Redmi A5 (रेडमी A5)
शाओमीचा नवीन रेडमी A5 स्मार्टफोन भारतात 15 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. हा फोन फ्लिपकार्ट आणि शाओमी इंडिया ई-स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. कंपनीनं याला "रॉयल डिझाइन" असं टॅगलाइन दिलं आहे, जे त्याच्या स्टायलिश लूकवर भर देतं. 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारा हा बजेट फोन 6.88-इंच HD+ डिस्प्ले, 5,200mAh बॅटरी आणि आधुनिक वैशिष्ट्यांसह भारतीय बाजारात लक्ष वेधण्यास सज्ज आहे.
2 DAYS TO GO!🚨 The REDMI A5 is launching soon with all the premium features you love, but at a price that won’t break the bank. 🎉
— Xiaomi Nigeria (@XiaomiNigeria) April 14, 2025
Are you ready for affordable innovation? 🚀#RedmiA5 #2DaysToGo pic.twitter.com/wcrsy2YK6x
रेडमी A5 तीन रंगांमध्ये उपलब्ध
रेडमी A5 जयसालमेर गोल्ड, जस्ट ब्लॅक आणि पॉन्डिचेरी ब्लू या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.88-इंच HD+ डिस्प्ले आहे, जो TÜV राइनलँड आय कम्फर्ट सर्टिफिकेशनसह येतो. फोनमध्ये युनिसॉक T7250 ऑक्टा-कोर चिपसेट, 4GB LPDDR4X रॅम आणि 128GB eMMC 5.1 स्टोरेज आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 32MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 15 गो एडिशनवर चालतो. यातद 5,200mAh बॅटरी असेल.
Samsung Galaxy M56 5G (सॅमसंग गॅलेक्सी M56 5G)
सॅमसंगनं आपल्या गॅलेक्सी M मालिकेत नवीन स्मार्टफोन, गॅलेक्सी M56 5G, 17 एप्रिल 2025 रोजी लाँच करण्याची घोषणा केली आहे. लाँचिंगपूर्वी, कंपनीनं Amazon वर एक मायक्रोसाइटद्वारे या फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांचा खुलासा केला आहे, ज्यामध्ये डिस्प्ले, कॅमेरा आणि डिझाइन यांचा समावेश आहे. सॅमसंगचा दावा आहे की हा स्मार्टफोन आपल्या सेगमेंटमधील सर्वात पातळ फोन असेल आणि यामध्ये प्रीमियम डिझाइन अपग्रेड्स असतील.
8/
— Mukul Sharma (@stufflistings) April 11, 2025
Some more details of the Galaxy M56 5G pic.twitter.com/OkmnllunOs
गॅलेक्सी M56 5G सर्वात पातळ फोन
गॅलेक्सी M56 5G मध्ये 6.7-इंचाचा फुल HD+ sAMOLED+ डिस्प्ले असेल, जो सेगमेंटमधील सर्वात तेजस्वी डिस्प्ले असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. हा फोन 7.2 मिमी पातळ असून, Corning Gorilla Glass Victus संरक्षणासह येतो. यात 50MP मुख्य सेन्सरसह ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS), 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो लेन्ससह ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी 12MP HDR फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय, 4K 30FPS व्हिडिओ 10-बिट HDR, Nightography, आणि AI-आधारित Object Eraser, Image Clipper सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. गॅलेक्सी M55 5G चा उत्तराधिकारी असलेला हा फोन Exynos 1480 चिपसेट, 8GB पर्यंत RAM, 256GB पर्यंत स्टोरेज, 5000mAh बॅटरी आणि Android 15-आधारित One UI 7 सह येईल.
Motorola Pad 60 Pro and Book 60 (मोटोरोला पॅड 60 प्रो आणि बुक 60)
चिनी स्मार्टफोन ब्रँड मोटोरोला भारतात पॅड 60 प्रो टॅबलेट आणि बुक 60 लॅपटॉप लॉंच करत आहे. हे दोन्ही डिव्हाइसेस 17 एप्रिल 2025 रोजी लाँच होणार आहेत. यापूर्वी अशी चर्चा होती की मोटोरोला एज 60 स्टायलससह हे डिव्हाइसेस लाँच होऊ शकतात, परंतु आता एज 60 स्टायलस 15 एप्रिलला स्वतंत्रपणे लाँच होईल. फ्लिपकार्टवरील मायक्रोसाइट्सवर या दोन्ही डिव्हाइसेसच्या लाँच तारखेसह प्रमुख वैशिष्ट्यांचा खुलासा झाला आहे.
मोटोरोला बुक 60
मोटोरोला आणि PANTONE यांच्या भागीदारीमुळे बुक 60 मध्ये PANTONE-क्युरेटेड रंग उपलब्ध असतील. फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार, यात 14-इंच 2.4K OLED डिस्प्ले असेल, ज्याची ब्राइटनेस 500 निट्स आहे. हा लॅपटॉप फक्त 1.4 किलो वजनाचा असून हलका आहे. यात स्मार्ट कनेक्ट वैशिष्ट्य आहे, जे लॅपटॉप, स्मार्टफोन आणि टॅबलेट यांच्यात स्मार्ट क्लिपबोर्ड आणि फाइल ट्रान्सफरसह सहज कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. फोनएरेना अहवालानुसार, यात इंटेल कोर 7 प्रोसेसर, 60Wh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जर असेल. याशिवाय, Dolby Atmos सह ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स असतील.
मोटोरोला पॅड 60 प्रो
बुक 60 प्रमाणेच यातही PANTONE-क्युरेटेड रंग असतील. यात 12.7-इंच 3K रिझोल्यूशन डिस्प्ले आणि 144Hz रिफ्रेश रेट आहे. हा टॅबलेट मीडियाटेक डायमेन्सिटी 8300 चिपसेटवर चालतो. ऑडिओसाठी यात Dolby Atmos सह JBL क्वाड स्पीकर्स आहेत. यात 10,200mAh बॅटरी आहे, जी 45W टर्बोपॉवर चार्जिंगला सपोर्ट करते आणि मोटोरोलाच्या दाव्यानुसार 10 तासांपर्यंत टिकेल. यासोबत AI-आधारित सर्च आणि ट्रान्सलेट वैशिष्ट्ये असतील. स्मार्ट कनेक्ट तंत्रज्ञानामुळं मोठ्या स्क्रीनशी सहज एकीकरण शक्य होईल.
Infinix Note 50s 5G+ (इनफिनिक्स नोट 50s 5G+)
इनफिनिक्स नोट 50s 5G+ स्मार्टफोन भारतात 18 एप्रिल 2025 रोजी लाँच होणार आहे, जो आपल्या सेगमेंटमधील सर्वात पातळ फोन असल्याचा दावा करतो. यात 144Hz रिफ्रेश रेटसह कर्व्ड AMOLED डिस्प्ले आणि अनोखी सेंट टेक्नॉलॉजी आहे. इनफिनिक्स नोट 50x नंतर लाँच होणारा हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. लाँचिंगपूर्वी, कंपनीनं याच्या कॅमेरा वैशिष्ट्यांचा खुलासा केला आहे, ज्यामध्ये 64MP मुख्य कॅमेरा आणि AI-आधारित फीचर्सचा समावेश आहे.
Time to redefine style and toughness!
— Infinix India (@InfinixIndia) April 14, 2025
The all-new Infinix #Note50s5G with an exquisite design and Military-Grade Toughness is launching on 18th April!
Excited ho?
Yahan jao: https://t.co/Ga2nLcJl7y#NOTEkaro pic.twitter.com/lSa5Z6a5AJ
64MP Sony IMX682 मुख्य कॅमेरा
इनफिनिक्स नोट 50s 5G+ मध्ये 64MP Sony IMX682 मुख्य कॅमेरा आहे, जो उत्कृष्ट क्लॅरिटी आणि पोर्ट्रेट फोटो देण्याचा दावा करतो. यात ड्युअल LED फ्लॅश, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग (30fps), 10x डिजिटल झूम आणि AI हॅलो टायमर आहे, जे ग्रुप शॉट्स आणि सेल्फीसाठी उपयुक्त आहे. समोरच्या बाजूला 13MP सेल्फी कॅमेरा आहे. यात 12 हून अधिक फोटोग्राफी मोड्स, ड्युअल व्हिडिओ मोड आणि व्हीलॉग मोड आहे. AI वैशिष्ट्यांमध्ये AI इरेजर (अनावश्यक गोष्टी काढण्यासाठी), AI कटआउट (रिअल-टाइम स्टिकर्ससाठी) आणि AI गॅलरी (स्वयंचलित फोटो व्यवस्थापन आणि इमेज वर्धन) यांचा समावेश आहे.
6.78-इंच कर्व्ड AMOLED डिस्प्ले
फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार, फोनमध्ये 6.78-इंच कर्व्ड AMOLED डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट, Corning Gorilla Glass 5 आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हा फोन मरीन ड्रिफ्ट ब्लू (व्हीगन लेदर, सेंट टेक), टायटॅनियम ग्रे आणि रुबी रेड रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात जेम-कट डिझाइन, अॅक्टिव्ह हॅलो लायटिंग (कॅमेरा टायमर, गेमिंग आणि फोलॅक्स असिस्टंटसाठी) आहे. किंमत अद्याप निश्चित नाही, परंतु हे नोट सीरिजमधील नवीन मॉडेल आहे.
Oppo K13 5G (ओप्पो K13 5G)
ओप्पोचा नवीन स्मार्टफोन ओप्पो K13 5G भारतात 21 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे, आणि हा फोन गेमिंगप्रेमींसह सर्वांचं लक्ष वेधणार आहे! मीडियाटेक डायमेन्सिटी 8400 चिपसेट, 7000mAh ची प्रचंड बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह हा फोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. फ्लिपकार्टवरील मायक्रोसाइटनं या फोनच्या आकर्षक वैशिष्ट्यांनी उत्सुकता वाढवली आहे, तर टिप्स्टर @Anvin यांनी X वर याची झलक शेअर केली आहे.
Oppo K13 is launching on April 21 in India.
— Anvin (@ZionsAnvin) April 14, 2025
Oppo K13 key specifications:
- 120Hz OLED display, 1200nits brightness
- Snapdragon 6 Gen 4
- 7000mAh battery
- 8GB RAM
- 256GB storage
- 80W charging
- 50MP main camera
- 6,000mm² graphite + 5,700mm² vapour cooling chamber unit
-… pic.twitter.com/JhM04WC3Ud
50MP मुख्य कॅमेरा
ओप्पो K13 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह चमकदार OLED डिस्प्ले आहे, जो 1200 निट्स ब्राइटनेससह उजळ अनुभव देतो. यात स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 ची जबरदस्त स्पीड, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. 50MP मुख्य कॅमेरा शानदार फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करेल. 7000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगमुळं फोन झटपट चार्ज होईल, तर 6,000mm² ग्रॅफाइट आणि 5,700mm² व्हेपर कूलिंग चेंबर गेमिंग दरम्यान फोन थंड राहील. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, ओल्या हातांनी काम करणारा वेट टच डिस्प्ले, ड्युअल स्पीकर्स, IR ब्लास्टर आणि ColorOS 15 चा स्टायलिश इंटरफेस आहे. यंदा ओप्पो K13 5G गेमिंग, बॅटरी आणि डिझाइनच्या बाबतीत नवा मानदंड प्रस्थापित करेल.
Vivo T4 5G (व्हिवो T4 5G)
व्हिवो T4 5G हा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन भारतात 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे! व्हिवो इंडियाच्या इन्स्टाग्राम पेजवर याची अधिकृत पुष्टी झाली आहे. हा धमाकेदार फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल, ज्यात स्नॅपड्रॅगन 7s जेन 3 चिपसेट, 7300mAh ची प्रचंड बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंगसह येतो. गेमिंग आणि मल्टिटास्किंगसाठी हा फोन तरुणाईचा आवडता ठरणार आहे. फ्लिपकार्टवरील मायक्रोसाइट आणि लीकमुळं याच्या आकर्षक वैशिष्ट्यांची झलक आता समोर आली आहे!
#GetSetTurbo and multitask in the blink of an eye with the new #vivoT4, coming in hot on 22nd April! #TurboLife is within your reach.
— vivo India (@Vivo_India) April 14, 2025
Know More - https://t.co/O732aX97oE#vivoT4 #GetSetTurbo #TurboLife #ComingSoon pic.twitter.com/pD5CV9CpnY
डिझाइन आणि डिस्प्ले
व्हिवो T4 5G स्टायलिश डिझाइनसह येतो, ज्यामध्ये मोठा गोलाकार रियर कॅमेरा मॉड्यूल आहे. हा फोन एमराल्ड ब्लेझ आणि फँटम ग्रे रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात 6.67-इंच FHD+ क्वाड-कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह गेमिंग आणि स्क्रोलिंगला स्मूथ बनवेल.
कामगिरी
स्नॅपड्रॅगन 7s जेन 3 चिपसेट आणि Android 15-आधारित FunTouchOS 15 यामुळं हा फोन जबरदस्त परफॉर्मन्स देईल. यात 8GB+128GB, 8GB+256GB आणि 12GB+256GB असे तीन स्टोरेज पर्याय असतील. IR ब्लास्टर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर यासारखी आधुनिक वैशिष्ट्ये यात मिळतील.
कॅमेरा
फोटोग्राफी प्रेमींसाठी यात 50MP Sony IMX882 प्रायमरी कॅमेरा आहे, जो OIS सपोर्टसह येतो, तसंच 2MP सेकंडरी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी 32MP फ्रंट कॅमेरा शानदार फोटो देईल.
बॅटरी
व्हिवो T4 5G मध्ये 7300mAh ची दमदार बॅटरी आहे, जी 90W फास्ट चार्जिंगसह झटपट चार्ज होईल. ही बॅटरी दीर्घकाळ टिकणारी कामगिरी देईल, विशेषतः गेमिंग आणि स्ट्रीमिंगसाठी.
किंमत
व्हिवो T4 5G ची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे, ज्यामुळं हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये आकर्षक पर्याय ठरेल. कंपनीनं याबाबत X वर माहिती शेअर केली आहे, आणि लाँचपूर्वीच लीकमुळं चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
लाँच टाइमलाइन
व्हिवो T4 5G 22 एप्रिल रोजी भारतात लाँच होणार आहे. फ्लिपकार्टवर यासाठी खास मायक्रोसाइट लाइव्ह आहे, जिथे याच्या वैशिष्ट्यांची झलक पाहायला मिळत आहे.
हे वाचलंत का :