हैदराबाद : इलेक्ट्रिक वाहनं (EVs) आता केवळ भविष्यातील संकल्पना राहिलेली नाहीत; ती आता भारतीय रस्त्यांवर आपलं स्थान निर्माण करत आहेत. EV कार आता अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि टिकाऊपणाच्या वाढत्या जागरूकतेमुळं भारतीय खरेदीदार हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडं वळत आहेत. 2025 मध्ये, 15 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक इलेक्ट्रिक कार्स आधुनिक वैशिष्ट्ये आणि चांगली रेंज देतात. चला, भारतातील टॉप 5 बजेट-अनुकूल इलेक्ट्रिक कार्सची आज आपण Tata Tiago EV, MG Comet EV, Tata Punch EV, Citroen eC3, Tata Nexon EV MR सारख्या EV ची माहीत घेऊया...
टाटा टियागो EV
टाटा टियागो EV ही या सेगमेंटमधील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार आहे. सुमारे 7.99 लाख रुपये किंमतीची ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येते. या कारची 19.2 kWh बॅटरी 250 किमी रेंज देते, तर 24 kWh बॅटरी 315 किमी रेंज देते. फास्ट-चार्जिंग सुविधा, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल आणि ड्युअल एअरबॅग्स यामुळं ही कार शहरातील प्रवासासाठी फायदेशीर ठरू शकते.
MG कॉमेट EV
MG कॉमेट EV ही छोटीशी इलेक्ट्रिक हॅचबॅक शहरातील प्रवासासाठी डिझाइन केलेली आहे. 6.99 लाख रपयांपासून सुरू होणारी ही कार 230 किमी रेंज देते. ड्युअल स्क्रीन्स आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटी असलेला डॅशबोर्ड, तसेच छोटे टर्निंग रेडियस यामुळं ती तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेत पुढे आहे.
टाटा पंच EV
लोकप्रिय मायक्रो-एसयूव्ही आता इलेक्ट्रिक अवतारातही उपलब्ध आहे. 9.99 लाखांपासून सुरू होणारी टाटा पंच EV दोन बॅटरी पर्यायांसह येते, जी 315 किमी ते 421 किमी रेंज देते. 10.25-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा आणि सहा एअरबॅग्स यामुळं ही कार सुरक्षित आणि वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे.
सिट्रोएन eC3
सिट्रोएनची eC3 ही इलेक्ट्रिक हॅचबॅक सुमारे 11.5 लाख किंमतीत उपलब्ध असून ती 320 किमी रेंज देते. प्रशस्त आतील भाग, उत्कृष्ट इन्फोटेनमेंट सिस्टम आणि युरोपियन ड्रायव्हिंग अनुभवाची झलक देणारी ही कार दैनंदिन प्रवासासाठी आरामदायी आणि कार्यक्षम आहे.
टाटा नेक्सॉन EV MR
नेक्सॉन EV ची मध्यम-रेंज आवृत्ती ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक SUV आहे. 12.49 लाख किंमतीची ही कार 30 kWh बॅटरीसह येते, जी सुमारे 325 किमी रेंज देते. डिजिटल क्लस्टर, टचस्क्रीन सिस्टम, प्रीमियम ऑडिओ आणि मजबूत सुरक्षा पॅकेज यामुळं ही कार कुटुंबांसाठी चांगला पर्याय आहे.
हे वाचलंत का :