मुंबई : भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत सध्या एसयुव्हीची क्रेझ आहे. याच ट्रेंडला लक्षात घेऊन टाटा मोटर्सनं मुंबईतील एका दिमाखदार सोहळ्यात आपली नवीन इलेक्ट्रिक एसयुव्ही ‘हॅरियर डॉट ईव्ही’ लाँच केली आहे. 80 टक्के भारतीय बनावटीची ही हाय-परफॉर्मन्स ईव्ही 21 लाख 49 हजार (एक्स-शोरूम) किमतीपासून सुरू होत असून, 2 जुलैपासून बुकिंगला सुरुवात होईल. ही कार शक्ती, स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट संगम आहे.
शक्तिशाली परफॉर्मन्स आणि ऑल-व्हील ड्राइव्ह
हॅरियर डॉट ईव्ही ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टमसह येते, जी कोणत्याही रस्त्यावर वर्चस्व गाजवते. यातील मोटर 570 एनएम टॉर्क जनरेट करते, ज्यामुळं ही कार अवघ्या 6.3 सेकंदात 0 ते 100 किमी वेग गाठते. ग्राहकांना यात दोन बॅटरी पर्याय मिळतील.फुल चार्जवर ही कार 627 किमी रेंज देते, ज्यामुळं लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ती आदर्श आहे. 120 किलोवॅट डीसी फास्ट चार्जरनं 25 मिनिटांत 80 टक्के चार्जिंग आणि 15 मिनिटांत 250 किमी रेंज मिळते, असा टाटाचा दावा आहे.
टेक्नॉलॉजी आणि सुरक्षेचा अनोखा अनुभव
ही कार टेक्नॉलॉजीच्या बाबतीत फुल लोडेड आहे. यात एआय-आधारित एडास सिस्टिम, ऑटोमॅटिक पार्किंग, इमर्जन्सी ब्रेक्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. मनोरंजनासाठी सॅमसंगच्या QLED 14.53 इंच मेन स्क्रीनवर 25 हून अधिक अॅप्स, ओटीटी आणि गेम्स उपलब्ध आहेत. जेबएलची एटमॉस डटल्बी साऊंड सिस्टिम म्युझिकचा अनुभव अविस्मरणीय करते. किलेस फीचरसह मोबाईलद्वारे सात जणांना मर्यादित अॅक्सेस देण्याची सुविधा आहे. याशिवाय, युपीआय वॉलेटद्वारे पेमेंटची सुविधाही कारमध्येच उपलब्ध आहे.
आकर्षक डिझाइन आणि रंग
हॅरियर डॉट ईव्ही बोल्ड आणि मस्क्युलर लूक कायम ठेवते. यात 19 इंचांचं अलॉय व्हील्स, LED बाय-प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, सिक्वेन्सियल टर्न सिग्नल्स आणि हॅरियर लोगो प्रोजेक्शनसह ORVM आहेत. ही कार नैनिताल नॉक्टर्न, एम्पॉवर्ड ऑक्साइड, प्युअर ग्रे आणि प्रिस्टाइन व्हाइट रंगांत उपलब्ध आहे. मॅट ब्लॅक स्टेल्थ रंगातील खास एडिशनही ग्राहकांना आकर्षित करेल. टाटा हॅरियर डॉट ईव्ही ही शक्ती, तंत्रज्ञान आणि डिझाइनचा अप्रतिम मेळ साधणारी इलेक्ट्रिक एसयुव्ही आहे. भारतीय बाजारपेठेत ती नक्कीच गेम-चेंजर ठरेल.
हे वाचलंत का :