केप कॅनवेरल Sunita Williams : नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स तसंच बुच विल्मोर यांनी पत्रकार परिषदेत अनेक पश्नाची उत्तर दिली. त्यांनी स्पेस सेंटरमधून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुनीता विल्यम्स यांनी सांगितलं की, बोइंग विमान पृथ्वीवर रवाना झालं. त्यामुळं आमच्यासाठी बोईंग राईडला सोडण होतं. मला अंतराळात राहायला आवडतं. हे माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या यूएस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. कारण त्यांचा अवकाशातील मुक्काम किमान फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढणार आहे.
स्टारलाईनमध्ये खराबी : विल्यम्स आणि विल्मोर दोन्ही अंतराळवीर जूनपासून अंतराळ स्थानकावर अडकून पडले आहेत. स्टारलाइनर पृथ्वीवर परतल्यानंतर एका आठवड्यानंतर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. या दोघांनी 5 जून रोजी त्यांच्या पहिल्या क्रू फ्लाइटसाठी बोईंगच्या स्टारलाइनर अड्डान घेतलं होतं. मात्र, स्टारलाईनमध्ये खराबी अल्यानं ते त्यांच्याशिवय पृथ्वीवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यांहून अधिक काळ अंतराळात राहिल्यानंतर हे यान 6 सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या परत आलं. न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड्स स्पेस हार्बरवर यानं सुरक्षित लँडिंग केलं.
SpaceX ड्रॅगन मधून येणार वापस : दोन्ही अंतराळवीर Expedition 71/72 क्रूचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहतील. फेब्रुवारी 2025 मध्ये NASA च्या SpaceX Crew-9 मोहिमेवरील इतर दोन क्रू सदस्यांसह SpaceX ड्रॅगन अंतराळ यानातून वापस येतील. अंतराळवीरांनी सांगितलं, आम्हाला अमेरिकेतील निवडणुकीत मतदान करायचं. तसंच मतदान करण नागरिकांची महत्त्वाची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय. "मी आजच मतासाठी माझी विनंती पाठवली आहे, ते काही आठवड्यांत आम्हाला मतदानाची मान्यता देतील," असं विल्मोर म्हणाले. नागरिक म्हणून त्या निवडणुकांमध्ये सहभागी होणं आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही त्या संधीसाठी उत्सुक आहोत. असं त्यांनी म्हटलं.
अंतराळातून मतदान करण्याची इच्छा : 1997 पासून अंतराळवीर अंतराळातून मतदान करत आहेत. टेक्सास विधानसभेनं नासा कर्मचाऱ्यांना अंतराळातून मतदान करण्याची परवानगी देणारे विधेयक मंजूर केलं होतं, असं न्यूयॉर्क पोस्टनं वृत्त दिलंय. त्या वर्षी, नासाचे अंतराळवीर डेव्हिड वुल्फ मीर स्पेस स्टेशनवर अंतराळातून मतदान करणारे पहिले अमेरिकन बनले होते. 2020 मध्ये, NASA अंतराळवीर केट रुबिन्सनं देखील ISS वर अंतराळातून मतदान केलं. सुनीता विल्यम्स म्हणाल्या की, स्टेशन लाइफमध्ये येणं तितकं अवघड नव्हतं, कारण आम्ही दोघेही इथं आधी राहत होते. "हे माझं आनंदाचं ठिकाण आहे. मला इथं अंतराळात राहायला आवडतं. ज्यावर आम्ही काम करणार आहोत, परंतु स्टारलाइनरमध्ये अंतराळात मानवांची ही पहिलीच वेळ आहे. पुढं विल्मोर म्हणाले की, कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यानं खूप संयम आणि चारित्र्य निर्माण होतं. "आम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितींना तोंड देण्यासाठी शिकतो, प्रशिक्षण घेतो. हे फक्त नासामध्येच नाही, तर मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत हेच केलं आहे. काहीही झाले तरी आम्ही आमचे सर्वोत्तम काम दररोज करणार आहोत. कारण जे लोक या प्रकारचं काम करतात त्यांना तेच करावं लागेल.
'हे' वाचलंत का :