ETV Bharat / technology

गेल्या 16 वर्षांत सूर्याची हालचाल वाढली, हवामान आणि तंत्रज्ञानावर परिणाम - नासा

नासाच्या अहवालानुसार, गेल्या 16 वर्षांत सूर्याची हालचाल वाढली आहे, ज्यामुळे अंतराळ हवामान आणि पृथ्वीवरील तंत्रज्ञानावर परिणाम होऊ शकतो.

SUN MOVEMENT IS INCREASING  AFFECT EARTH CLIMATE AND TECHNOLOGY  सूर्याची हालचाल वाढली  नासा
सूर्या (Nasa)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : September 19, 2025 at 5:24 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : सूर्य, गेल्या काही दशकांपासून असामान्य काळात प्रवेश करत असल्याचं मानलं जात होतं, 2008 नंतर अचानक तो सक्रिय झाल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणे आहे. सायंटिफिक अमेरिकनच्या अलीकडील लेखानुसार, 2008 मधील "खोल सौर न्यूनतम" (deep solar minimum) नंतर सूर्याच्या हालचालींमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. सौर वादळे आणि कोरोनल मास इजेक्शन (CME) यांसारख्या अंतराळ हवामानाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नासाच्या संशोधनातून स्पष्ट झालं की, सूर्य आता असामान्य अवस्थेतून बाहेर पडत आहे, ज्यामुळे पृथ्वीवरील पायाभूत सुविधा आणि भविष्यातील चंद्र, मंगळ मोहिमांवर परिणाम होऊ शकतो. सूर्याच्या या बदलत्या स्वभावाचा अभ्यास करणे अंतराळ हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी आणि संभाव्य धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचं आहे.

1980 च्या दशकापासून सूर्याची सक्रियता कमी होत होती आणि 2008 मध्ये ती अभूतपूर्व खोल सौर न्यूनतम अवस्थेत पोहोचली होती. संशोधकांना अपेक्षा होती की, सूर्याचा हा शांत काळ कायम राहील. 17व्या शतकात सुर्यावरील सौर वादळांचं प्रमाण कमी झालं होते. तथापि, नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (JPL) चे प्रमुख संशोधक जेमी जासिन्स्की यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात सूर्याच्या सौर वाऱ्याच्या प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्राच्या मापदंडांमध्ये 2008 नंतर वाढ झाली आहे. द Astrophysical Journal Letters मध्ये प्रकाशित या अभ्यासात नासाच्या ACE आणि Wind मोहिमांद्वारे संकलित केलेल्या हेलिओस्फेरिक डेटाचा वापर करण्यात आलायय

या अभ्यासानुसार, सूर्य आता आपल्या शांत अवस्थेतून बाहेर पडत आहे आणि सौर वादळे आणि CME यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांचा पृथ्वीवरील वीजपुरवठा, उपग्रह संचार आणि जीपीएस यंत्रणांवर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, तीव्र सौर वादळांमुळं पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे ब्लॅकआउट किंवा उपग्रहांचं नुकसान होऊ शकतं. याशिवाय, भविष्यातील चंद्र आणि मंगळ मोहिमांवरील अंतराळवीरांना सौर किरणोत्सर्गापासून धोका निर्माण होऊ शकतो.

नासानं अंतराळ हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी आपली संसाधनं केंद्रित केली आहेत. येत्या 23 सप्टेंबर रोजी नवीन मोहिमा सुरू होणार आहेत, ज्या सौर घटनांचं अधिक चांगले निरीक्षण आणि अंदाज प्रदान करतील. सूर्याच्या बदलत्या स्वभावाचा अभ्यास करणे केवळ पृथ्वीवरील पायाभूत सुविधांचं संरक्षण करण्यासाठीच नव्हे तर अंतराळ संशोधनाच्या भविष्यासाठीही महत्त्वाचं आहे. सूर्याच्या दीर्घकालीन आणि अल्पकालीन वर्तनाचा अंदाज बांधणे कठीण आहे, परंतु अशा संशोधनांमुळं शास्त्रज्ञांना त्याची गतिशीलता समजण्यास मदत होईल.

सूर्याच्या या नव्या सक्रिय अवस्थेमुळं शास्त्रज्ञांना त्याच्या अनपेक्षित वर्तनाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे. माउंडर मिनिमम सारख्या ऐतिहासिक घटनांशी तुलना करताना, सूर्याच्या सध्याच्या वर्तनामुळे भविष्यातील अंतराळ हवामानाचा अंदाज लावण्यासाठी नवीन अंतर्दृष्टी मिळू शकते. सूर्याचा या पृथ्वी आणि अंतराळ मोहिमांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी नासा आणि इतर अंतराळ संस्था सतर्क राहतील.

हे वाचलंत का :

  1. सूर्यग्रहण 2025 : कधी आणि कुठे पहायचं?, सूर्यग्रहण पाहण्यासाठी सुरक्षित टिप्स
  2. नासानं शोधले 6,000 परग्रह; सूर्यमालेबाहेरील जीवनाच्या शोधाला नवीन दिशा
  3. 2025 FA22 लघुग्रह आज पृथ्वीजवळून जाणार, पृथ्वीला कोणताही धोका नाही - नासा