हैदारबाद : स्नॅपचॅटनं गुरुवारी ॲपल वॉचसाठी नवीन ॲप लाँच करून आपली उपलब्धता वाढवली आहे. या ॲपद्वारे युजर्सना येणारे मेसेज पाहता येतात आणि डिक्टेशन किंवा स्क्रिबलसारख्या पर्यायांचा वापर करून उत्तर देता येतं. यासोबतच, स्नॅपचॅटनं आपला लेन्स स्टुडिओ ॲप iOS आणि वेब ॲप म्हणूनही सादर केलं आहे, ज्यामुळं डेव्हलपर्स कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून युनिक लेन्सेस तयार करू शकतात.
Snapchat, everywhere! We know you love using Snapchat across all your digital surfaces – that’s why we’re making it easier for you to take your conversations on the go with Snapchat now available on Apple Watch⌚ pic.twitter.com/YQkiOZJseA
— Snapchat (@Snapchat) June 5, 2025
ॲपल वॉच ॲप
स्नॅपचॅटनं आपल्या न्यूजरूम पोस्टमध्ये ॲपल वॉच ॲपबद्दल माहिती दिली आहे. सध्या स्नॅपचॅटचे 900 दशलक्षांहून अधिक युजर्स आहेत आणि “आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या डिव्हाइसेसची संख्या वाढली आहे,” असं प्लॅटफॉर्मनं म्हटलं आहे. युजर्सना एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी, स्नॅपचॅटनं ॲपल वॉच ॲप लाँच केलं आहे, जे watchOS 9.0 फर्मवेअरवर चालतं.
हे ॲप स्मार्टफोन, टॅबलेट आणि वेब यांसारख्या विद्यमान प्लॅटफॉर्म्सना जोडतं.ॲपल वॉचवरील ॲपची कार्यक्षमता काहीशी मर्यादित आहे. युजर्स ॲपल वॉच ॲपद्वारे थेट मेसेज किंवा स्नॅप्स पाठवू शकत नाहीत, परंतु येणाऱ्या मेसेजला स्क्रिबल, डिक्टेशन किंवा इमोजी वापरून उत्तर देऊ शकतात. युजर्स स्क्रीनवर स्क्रिबल करू शकतात आणि स्मार्टवॉचच्या ऑन-स्क्रीन कीबोर्डचा वापर करू शकतात.
दरम्यान, स्नॅपचॅटनं आपला लेन्स स्टुडिओ ॲप iPhone आणि वेबवर उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी फक्त डेस्कटॉपवर मर्यादित असलेलं हे ॲप आता iOS युजर्सना ऑगमेंटेड रियालिटी (AR) आधारित नवीन लेन्सेस तयार आणि प्रकाशित करण्यासाठी प्रायोगिक साधनं प्रदान करतं. युजर्स AI चा वापर करून इफेक्ट्स तयार करू शकतात आणि बिटमोजी जोडून स्वतःला व्यक्त करणारे लेन्सेस बनवू शकतात.
डेस्कटॉप ॲप्लिकेशन हे प्रोफेशनल डेव्हलपर्ससाठी प्राथमिक साधन राहील, परंतु नवीन iOS ॲप आणि वेब टूल यांचा उद्देश अधिक लोकांना लेन्सेस तयार करण्यासाठी प्रोत्साहित करणं आहे. लेन्स स्टुडिओ ॲप iPhone साठी ॲप स्टोअरवर विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे आणि lensstudio.snapchat.com या वेबसाइटवर होस्ट केलं आहे.
हे वाचलंत का :