हैदराबाद : सॅमसंगनं आपल्या आगामी गॅलेक्सी Z फोल्ड 7, Z फ्लिप 7 आणि Z फ्लिप 7 FE फोल्डेबल फोन्सबाबत संकेत दिले आहेत. लीक झालेल्या माहितीनुसार, यामध्ये विविध स्टोरेज, रॅम आणि रंग पर्याय उपलब्ध असतील. येत्या जुलै 2025 मध्ये हे फोन लॉंच होण्याची शक्यता आहे, ज्यामुळं फोल्डेबल तंत्रज्ञान अधिक रोमांचक आणि परवडणारे होणार आहे.
कोणते फोन होतील लॉंच
सॅमसंग आपल्या पुढील पिढीच्या फोल्डेबल फोन्ससह, गॅलेक्सी Z फोल्ड 7, Z फ्लिप 7 आणि नवीन Z फ्लिप 7 FE, बाजारात नवीन क्रांती घडवण्यास सज्ज आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, या फोन्सच्या वैशिष्ट्यांबाबत आणि रंग पर्यायांबाबत माहिती समोर आली आहे.
गॅलेक्सी Z फोल्ड 7
गॅलेक्सी Z फोल्ड 7 मध्ये तीन मॉडेल्स लॉंच होण्याची शक्यता आहे. हा फोन सिल्व्हर शॅडो, ब्लू शॅडो, जेटब्लॅक आणि कोरलरेड रंगात लॉंच होण्यची शक्यता आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह येईल आणि त्यात 200MP मुख्य कॅमेरा असण्याची शक्यता आहे. याची जाडी 4.5mm (ओपन केल्यावर) आणि 8.2mm (फोल्ड केल्यावर) असेल, ज्यामुळं तो सॅमसंगचा सर्वात पातळ फोल्डेबल फोन ठरू शकतो.
गॅलेक्सी Z फ्लिप 7
गॅलेक्सी Z फ्लिप 7 हा क्लॅमशेल डिझाइनप्रेमींसाठी आहे. यामध्ये तो तीन प्रकार लॉंच होऊ शकतो: 8GB रॅमसह 128GB स्टोरेज आणि 12GB रॅमसह 256GB किंवा 512GB स्टोरेज. रंग पर्यायांमध्ये ब्लू शॅडो आणि व्हाइट ब्लॅक यांचा समावेश असेल. यात 6.85-इंच मुख्य डिस्प्ले आणि 4-इंच कव्हर स्क्रीन असेल, तसंच 4,174mAh बॅटरी आणि 50MP मुख्य कॅमेरा असेल. याला स्नॅपड्रॅगन 8 एलिट किंवा एक्सिनॉस 2500 चिपसेट मिळू शकते.
गॅलेक्सी Z फ्लिप 7 FE
गॅलेक्सी Z फ्लिप 7 FE हा सॅमसंगचा पहिला परवडणारा फोल्डेबल फोन आहे. यामध्ये 8GB रॅमसह 128GB किंवा 256GB स्टोरेज पर्याय असतील. रंग पर्याय ब्लॅक आणि व्हाइटपुरते मर्यादित आहेत. यात 3.4-इंच कव्हर स्क्रीन आणि स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 किंवा एक्सिनॉस 2400e चिपसेट असेल. याची किंमत सुमारे 96,000 रुपये असण्याची शक्यता आहे.
Z फोल्ड 7 अल्ट्रा
लीकमध्ये Z फोल्ड 7 अल्ट्राची माहिती नसली, तरी सॅमसंगच्या टीझरनुसार हा फोन 4.6mm जाडीचा असू शकतो, जो सॅमसंगचा सर्वात पातळ फोल्डेबल फोन ठरेल. याबाबत अधिक माहिती लवकरच येण्याची अपेक्षा आहे.
गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट
सॅमसंगनं या फोनची लॉंच तारीख जाहीर केलेली नसली, तरी जुलै 2025 मधील गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये हे फोन सादर होण्याची शक्यता आहे. विविध मॉडेल्स आणि परवडणाऱ्या पर्यायांसह सॅमसंग फोल्डेबल फोन्सची श्रेणी अधिक आकर्षक बनवत आहे.
हे वाचलंत का :