हैदराबाद : सॅमसंग गॅलेक्सी एस25एज लाँच झाला आहे. कंपनीचा हा फोन 200 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरासह येतो. हा कंपनीचा खूपच स्लिम फोन आहे. त्याची जाडी फक्त 5.8 मिमी आहे. हा फोन 12 जीबी रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज पर्यायात लाँच करण्यात आला आहे.
@SatishMagre Introducing the #GalaxyS25 Edge—the slimmest Galaxy S Series ever. Built with sleek titanium and a powerful 200MP camera. Welcome to the Edge, where slim meets premium performance. #GalaxyAI
— Samsung Mobile (@SamsungMobile) May 13, 2025
Learn more: https://t.co/CRI1HysrBZ
Reply #stop to unsubscribe. pic.twitter.com/JRL2ucf2IN
200 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा
सॅमसंगनं त्यांच्या गॅलेक्सी एस मालिकेतील एक नवीन फोन लाँच केला आहे. त्याचं नाव सॅमसंग गॅलेक्सी एस25 एज आहे. या फोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. हा फोन 12 जीबी रॅमसह येतो. यात स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर आहे. हा सॅमसंगचा फोन खूपच स्लिम आहे.त्याची जाडी फक्त 5.8 मिमी आहे. या वर्षी लाँच झालेल्या पातळ आयफोन (आयफोन 17 एअर) ला तो टक्कर देऊ शकतो. फोनमध्ये बिल्ट-इन एआय फीचर्स आहेत.
@SatishMagre The best of #GalaxyAI now fits in any pocket. Meet #GalaxyS25 Edge – the slimmest Galaxy S Series ever 👏 Welcome to the Edge, where slim meets premium performance.
— Samsung Mobile (@SamsungMobile) May 13, 2025
Learn more: https://t.co/cMxmAZsau2
Reply #stop to unsubscribe. pic.twitter.com/h9W7FExwsO
जगभरातील 30 देशांमध्ये लाँच करणार
सॅमसंग गॅलेक्सी एस25 एजची विक्री 23 मे रोजी दक्षिण कोरियामध्ये आणि 30 मे रोजी अमेरिकेत होईल. कंपनी हा फोन जगभरातील 30 देशांमध्ये लाँच करणार आहे. गॅलेक्सी एस25 एज तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात टायटॅनियम जेट ब्लॅक, टायटॅनियम आइसी ब्लू आणि टायटॅनियम सिल्व्हर रंगाचा समावेश आहे.त्याची सुरुवातीची किंमत (256जीबी स्टोरेज) 1099.99 $(सुमारे 93,462 रुपये) आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस25 एजची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये 6.7-इंचाचा QHD+ डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये देण्यात येणारा हा डिस्प्ले 120 हर्ट्झ पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी, कंपनी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास सिरेमिक 2 देत आहे. फोनच्या परिमाणांबद्दल बोलायचं झालं तर, तो 75.6 X 158.2 X 5.8 मिमी आहे. त्याचे वजन फक्त 163 ग्रॅम आहे. हा फोन दोन प्रकारांमध्ये येतो - 12 जीबी + 256 जीबी आणि 12 जीबी + 512 जीबी. या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट आहे.

एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 200 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फीसाठी, कंपनी या फोनमध्ये 12-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. या डिव्हाइसमध्ये एडिटिंगसाठी अनेक आश्चर्यकारक एआय वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी 3900mAh आहे. ही बॅटरी 25 वॅट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. Samsung Galaxy S25 Edge हा Android 15 वर आधारित OneUI 7 वर चालतो. फोनची खास गोष्ट म्हणजे तो IP68 धूळ आणि पाणी प्रतिरोधक रेटिंगसह येतो.
गॅलेक्सी एस25 एजची भारतातील किंमत
भारतात सॅमसंग गॅलेक्सी एस25 एजची किंमत 12 जीबी + 256 जीबी पर्यायासाठी 1,09,999 रुपयांपासून सुरू होते, तर 12 जीबी + 512 जीबी प्रकाराची किंमत 1,21,999 रुपये आहे. सध्या हा हँडसेट सॅमसंग इंडिया ई-स्टोअरवर देशात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.
हे वाचलंत का :