सॅमसंगचा दिवाळीपूर्वीच धमाका : भारतात नवीन मिड-रेंज स्मार्टफोन गॅलक्सी M17 5G लाँच; जाणून घ्या, किंमत, वैशिष्ट्ये आणि ऑफर
सॅमसंग गॅलक्सी M17 5G आज लाँच झाला. 6.7-इंच AMOLED डिस्प्ले, एक्सिनोस 1330 चिप आणि 50MP OIS कॅमेरासह हा बजेट 5G फोन आहे.

Published : October 10, 2025 at 12:29 PM IST
हैदराबाद : सॅमसंग कंपनीनं आज, 10 ऑक्टोबर 2025 रोजी भारतात आपला नवीन मिड-रेंज स्मार्टफोन गॅलक्सी M17 5G लाँच केलाय. हा फोन गॅलक्सी M16 5G चा उत्तराधिकारी असून, किफायतशीर किंमतीत 5G तंत्रज्ञान, उत्तम कॅमेरा आणि प्रदर्शनासह येतो. डिझाइन आणि कामगिरीत सुधारणा करून सॅमसंगनं M-सीरिजच्या बजेट सेगमेंटमध्ये नवीन पर्याय आणला आहे. अमेझॉन इंडियावर मायक्रोसाइट उपलब्ध असून सेल सुरू झालाय. या बातमीत आपण फोनची किंमत, वैशिष्ट्ये आणि उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती घेऊया...

सॅमसंग गॅलक्सी M17 5G
हा फोन भारतीय बाजारपेठेतील स्पर्धात्मक किंमतीत येत असल्यानं तरुण आणि बजेट ग्राहकांसाठी आकर्षक ठरेल. या नवीन सॅमसंग गॅलक्सी M17 5G ची किंमत 12,499 रुपयांपासून सुरू होते. फोनमध्ये 6.7-इंच सुपर AMOLED डिस्प्ले, एक्सिनॉस 1330 प्रोसेसर आणि 50MP OIS कॅमेरा यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये आहेत, जी बजेट सेगमेंटमध्ये दुर्मीळ आहेत. IP54 धूल आणि पाणी प्रतिकारासह हा फोन दैनंदिन वापरासाठी टिकाऊ आहे.

किंमत आणि उपलब्धता
गॅलक्सी M17 5G च्या बेस व्हेरिएंटची (4GB RAM + 128GB स्टोरेज) किंमत 12,499 सुरू होते. Amazon द्वारे कूपन ऑफरनंतर हा फोन 12,499 रुपयांना उपलब्ध असण्याची शक्यता आहे. तर उच्च व्हेरिएंट (6GB RAM + 128GB)ची किंमत 13,999 रुपये आणि (8GB + 128GB) ची किंमत 15,499 आहे. सॅमसंगची M-सीरिज नेहमीप्रमाणे अनेक स्टोरेज पर्यायांसह येते, ज्यामुळे ग्राहकांना सोयीस्कर निवड करता येते. तुम्ही हा फोन अमेझॉन इंडियावर खरेदी करू शकता. अमेझॉननं आधीच मायक्रोसाइट सुरू केली असून इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि सॅमसंगच्या अधिकृत स्टोअर्सवरही हा फोन उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना निवडक बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर तीन महिन्यांपर्यंत व्याजमुक्त EMI चा लाभ घेता येईल.
The bold and sleek #GalaxyM17 5G is here.
— Samsung India (@SamsungIndia) October 10, 2025
A Monster so slim at 7.5mm that it fits right into your Monster life. Now in Sapphire Black and Moonlight Silver- colours so striking and distinct it matches your Monster vibe.#GalaxyM17 5G #LoveForMonster #MonsterInMotion #Samsung pic.twitter.com/ybZ4B20LLG
वैशिष्ट्ये आणि डिझाइन
गॅलक्सी M17 5G मध्ये 6.7-इंच सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस संरक्षणासह येतो. हा डिस्प्ले FHD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह व्हायव्हिड कलर्स आणि स्मूथ स्क्रोलिंग देतो. फोनची जाडी फक्त 7.5mm आहे, ज्यामुळे हातात हलका आणि आरामदायक वाटतो. रंग पर्यायांमध्ये मूनलाइट सिल्वर आणि सफायर ब्लॅक उपलब्ध असतील, जे आधुनिक आणि स्टायलिश लूक देतात.

प्रोसेसर
प्रोसेसर म्हणून सॅमसंगचा एक्सिनॉस 1330 चिपसेट वापरला गेला आहे, जो 5nm तंत्रज्ञानावर आधारित आहे. हा प्रोसेसर दैनंदिन टास्क्स, गेमिंग आणि मल्टिटास्किंगसाठी पुरेसा पॉवरफुल आहे. RAM पर्याय 4GB ते 6GB पर्यंत असून, स्टोरेज 128GB पर्यंत आहे (मायक्रोएसडी कार्डद्वारे विस्तार करता येईल). ऑपरेटिंग सिस्टम म्हणून वन UI 7 (अँड्रॉइड 15 वर आधारित) प्री-इन्स्टॉल आहे, ज्यात गुगलचा सर्कल टू सर्चसारखी AI वैशिष्ट्ये आहेत. हे वैशिष्ट्य कॅमेरा किंवा स्क्रीनवरून सर्च करणे सोपे करतं. IP54 रेटिंगमुळं फोन धूळ आणि हलक्या पावसापासून सुरक्षित राहतो.

कॅमेरा आणि बॅटरी
कॅमेरा सेटअप या फोनचं मुख्य आकर्षण आहे. मागच्या बाजूला 50MP प्रायमरी सेंसर आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) सह येतो. OIS मुळं कमी प्रकाशातही स्थिर आणि स्पष्ट फोटो मिळतात. यासोबत 5MP अल्ट्रा-वाइड लेंस (विस्तृत दृश्यांसाठी) आणि 2MP मॅक्रो लेंस (क्लोज-अप शॉट्ससाठी) आहेत. ट्रिपल कॅमेरा सेटअप नाइट मोड आणि AI एन्हान्समेंटसह येतो, ज्यामुळं सोशल मीडिया आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उत्तम आहे. समोरच्या बाजूला 13MP सेल्फी कॅमेरा आहे, जो ग्रुप सेल्फीज आणि व्हिडिओ कॉल्ससाठी योग्य आहे.

बॅटरी
यात 5,000mAh क्षमतेची बॅटरी वापरली गेली आहे, जी संपूर्ण दिवस चालते. 25W फास्ट चार्जिंग सपोर्टमुळं फोन जलद रिचार्ज होतो. टाइप-C पोर्ट आणि रिव्हर्स चार्जिंगसारखी वैशिष्ट्येही आहेत. फोनमध्ये सायड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB-C पोर्ट आहे.
| व्हेरिएंट | किंमत (Rs.) | वैशिष्ट्ये |
|---|---|---|
| 4GB + 128GB | 12,499 | - 6.7″ FHD+ Infinity-U Super AMOLED डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट, 1100 nits HBM, Gorilla Glass Victus - Exynos 1330 5nm प्रोसेसर, Mali-G68 MP2 GPU - 50MP (OIS) + 5MP (Ultra-wide) + 2MP (Macro) रियर कॅमेरा - 13MP फ्रंट कॅमेरा - 5000mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग - Android 15 आधारित One UI 7.0 - IP54 डस्ट आणि वॉटर रेझिस्टंट - साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर - 5G SA/NSA, Dual 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac, Bluetooth 5.3, NFC - रंग: Moonlight Silver, Sapphire Black |
| 6GB + 128GB | 13,999 | समान वैशिष्ट्ये (वर नमूद केल्याप्रमाणे), फक्त RAM मध्ये बदल (6GB) |
| 8GB + 128GB | 15,499 | समान वैशिष्ट्ये (वर नमूद केल्याप्रमाणे), फक्त RAM मध्ये बदल (8GB) |
लॉंच ऑफर्स
ग्राहक लॉंच ऑफरचा भाग म्हणून 4 जीबी, 6 जीबी आणि 8 जीबी व्हेरिएंट अनुक्रमे 11,999 रुपये, 13,499 रुपये आणि 14,99 रुपयांना खरेदी करू शकतात.
Rs. 500 बँक कॅशबॅक
- सर्व प्रमुख बँक/NBFC भागीदारांद्वारे 3 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI
Built for a Monster life on the go. Armed with 50MP No Shake Cam, the new #GalaxyM17 5G takes smooth and clear videos without any blur, even when shot through bumps and shakes. Pure Monster precision.#GalaxyM17 5G #LoveForMonster #MonsterInMotion #Samsung pic.twitter.com/JqZvkdj0sf
— Samsung India (@SamsungIndia) October 9, 2025
उपलब्धता
- 13 ऑक्टोबरपासून Amazon, Samsung.com आणि निवडक रिटेल स्टोअरवर उपलब्ध.
- रंग पर्याय: Moonlight Silver, Sapphire Black
सर्व मॉडेल्समध्ये 128GB इंटरनल स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडीद्वारे 2TB पर्यंत वाढवता येते.
सॅमसंग गॅलक्सी M17 5G हा फोन बजेट 5G सेगमेंटमध्ये उत्कृष्ट पर्याय आहे, जो किफायतशीर किंमतीत प्रीमियम वैशिष्ट्ये देते. OIS कॅमेरा, AMOLED डिस्प्ले आणि एक्सिनॉस प्रोसेसर यामुळं तो इतरांपासून वेगळा ठरतोय. भारतीय ग्राहकांसाठी हा फोन दैनंदिन वापर, फोटोग्राफी आणि एंटरटेनमेंटसाठी आदर्श आहे.
हे वाचलंत का :

