मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) च्या (P2M) व्यवहार मर्यादेत लवकरच सुधारणा करणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) व्यवहारांची मर्यादा 1₹ लाखावर कायम ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळं डिजिटल पेमेंट्समध्ये नवीन वापर संधी निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
UPI मर्यादा वाढणार
RBI नं जाहीर केलं की, UPI च्या व्यक्ती-ते-व्यापारी (P2M) व्यवहारांसाठी लवकरच मर्यादा सुधारित केल्या जातील. व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) व्यवहारांची मर्यादा मात्र 1 लाखावर रुपयावर कायम राहील. सध्या UPI ची मर्यादा P2P आणि P2M दोन्हीसाठी 1₹ लाख आहे, परंतु काही विशिष्ट P2M पेमेंट्ससाठी मर्यादा 2₹ लाख ते 5₹ लाखापर्यंत आहे. वापरकर्त्यांच्या नवीन गरजांनुसार ही मर्यादा ठरविण्यासाठी NPCI ला बँका आणि UPI परिसंस्थेतील भागधारकांशी चर्चा करून बदल करण्याचे स्वातंत्र्य असेल, असं RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 9 एप्रिल 2025 रोजी सांगितलं.
"P2M UPI व्यवहारांसाठी उच्च मर्यादा मंजूर करण्याचा RBI चा प्रस्ताव उद्योगासाठी स्वागतार्ह आहे. विविध व्यापाऱ्यांसाठी आणि नवीन वापर संधींसाठी उच्च मर्यादा नाविन्याला चालना देतील. सध्याच्या मर्यादांमुळं काही व्यापारी आणि व्यवसायांना डिजिटल पेमेंट्स स्वीकारण्यात अडचणी येत होत्या." - विशाल मारू, ग्लोबल प्रोसेसिंग हेड FSS
UPI च्या मर्यादा वाढल्यानं नवीन वापर संधी
P2M मर्यादा वाढल्यास UPI साठी नवीन वापर संधी कशा निर्माण होऊ शकतात, याबाबत तज्ञांनी त्यांचे मत मांडले आहे. यामुळं परदेशातील UPI पेमेंट्सना फायदा होईल. UPI पेमेंट्स स्वीकारणाऱ्या बहुतांश देशांच्या चलनांचे मूल्य भारतीय रुपयांपेक्षा जास्त आहे (काही अपवाद वगळता). त्यामुळं RBI नं भारतीय रुपयांनुसार ठरवलेल्या मर्यादा परदेशात पेमेंट करताना अपुऱ्या पडतात. आता उच्च मर्यादांमुळं ही कमतरता दूर होईल, अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली.
हे वाचलंत का :