हैदराबाद : रेडमी इंडियानं आपल्या नव्या वियरेबल डिव्हाइस, रेडमी वॉच मूवची लॉंच तारीख जाहीर केली आहे. ही स्मार्टवॉच 21 एप्रिल 2025 रोजी भारतात लॉंच होणार असून, ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवरील लँडिंग पेजवर तिचं डिझाइन आणि काही वैशिष्ट्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये रेडमी वॉच 5 ॲक्टिव्ह आणि रेडमी वॉच 5 लाइट लॉंच केल्यानंतर आता रेडमीनं या नव्या स्मार्टवॉचसह बाजारात आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे. या घड्याळात AMOLED डिस्प्ले, हायपरओएस ऑपरेटिंग सिस्टम आणि 14 दिवसांची बॅटरी लाइफ यांसारखी वैशिष्ट्ये असतील, असं कंपनीनं सांगितलं आहे.
You’ve waited long enough.
— Redmi India (@RedmiIndia) April 8, 2025
It’s not just about time anymore, it’s about making a move.#RedmiWatchMove is here to help you ditch the basic. Stop settling, and make #YourNextBigMove.
Launching on 21st April.
Know more: https://t.co/51dUm1eT6K
रेडमी वॉच मूव
रेडमी वॉच मूव भारतात 21 एप्रिल रोजी लॉंच होणार आहे. कंपनी ही स्मार्टवॉच “योरनेक्स्टबिगमूव” या हॅशटॅगसह प्रचार करत आहे. अधिकृत शाओमी वेबसाइटवरील लँडिंग पेजवरून समजतं की, या घड्याळाला चौकोनी डायल असेल आणि यूआय नेव्हिगेशनसाठी सिलिकॉन स्ट्रॅप देण्यात येईल. रेडमी वॉच मूव काळ्या रंगात उपलब्ध होण्याची शक्यता आहे, तसंच पोस्टर इमेजनुसार ती निळ्या, पांढऱ्या आणि ग्रे सिल्व्हर रंगातही येईल.
अपेक्षित किंमत
या स्मार्टवॉचमध्ये AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा आकार अद्याप जाहीर झालेला नाही. टिपस्टर मुकुल शर्मानं शेअर केलेल्या पोस्टरनुसार, या सेगमेंटमधील सर्वात चमकदार डिस्प्ले आणि 98.5 टक्के उत्कृष्टता या घड्याळात असेल. ही स्मार्टवॉच हायपरओएस ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल आणि 14 दिवसांची बॅटरी लाइफ देईल, जी या सेगमेंटमध्ये सर्वोत्तम असल्याचा दावा आहे. पोस्टर इमेजवरून रंग पर्यायांचा खुलासा झाला असून, अधिकृत वेबसाइटवरील मायक्रोसाइट लाइव्ह झाल्यावर येत्या काही दिवसांत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. रेडमी वॉच 5 ॲक्टिव्ह आणि वॉच 5 लाइट अनुक्रमे 3,499 रुपये आणि 2,799 रुपये किंमतीत लॉंच झाल्या होत्या, त्यामुळं रेडमी वॉच मूवची किंमतही या श्रेणीत असण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का :