हैदराबाद : डॅलसस्थित बायोटेक कंपनी कोलोसल बायोसायन्सेसनं 12,000 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायर वुल्फ प्रजातीच्या तीन पिल्लांचा ‘पुनर्जनन’ केल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळं सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. क्लोनिंग आणि जीन-एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून, प्राचीन डायर वुल्फ डीएनएच्या दोन नमुन्यांवर आधारित ही आधुनिक पिल्लं जन्माला घालण्यात आली आहेत. या तीन पिल्लाचं नाव रोमुलस, रेमस (दोन्ही सहा महिन्यांचे नर) आणि खालिसी (तीन महिन्यांची मादी) असं ठेवण्यात आले असून, त्यांना अमेरिकेतील एका गुप्त ठिकाणी वाढवण्यात आलं आहे. तसंच या तीन पिलांचा अभ्यास करण्यात येत आहे. या घोषणेनंतर एका भारतीय वापरकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना कंपनीनं या प्रकल्पाची माहिती दिलीय.
SOUND ON. You’re hearing the first howl of a dire wolf in over 10,000 years. Meet Romulus and Remus—the world’s first de-extinct animals, born on October 1, 2024.
— Colossal Biosciences® (@colossal) April 7, 2025
The dire wolf has been extinct for over 10,000 years. These two wolves were brought back from extinction using… pic.twitter.com/wY4rdOVFRH
तीन पिल्लांचं पुनर्जनन
डॅलसस्थित बायोटेक कंपनी कोलोसल बायोसायन्सेसनं एक आश्चर्यकारक घोषणा केली आहे. तब्बल 12,000 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायर वुल्फ या प्रजातीच्या तीन पिल्लांला त्यांनी पुनर्जनन केलं आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या काल्पनिक मालिकेमुळं लोकप्रिय झालेल्या या प्रजातीला पुन्हा जिवंत करण्यासाठी कंपनीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. सोमवारी कंपनीनं सांगितले की, त्यांच्या शास्त्रज्ञांनी प्राचीन डायर वुल्फ डीएनएच्या दोन नमुन्यांचा वापर करून क्लोनिंग आणि जीन-एडिटिंगद्वारे ही आधुनिक पिल्ले तयार केली आहेत.
डायर वुल्फच्या ओरडण्याचा आवाज रेकॉर्ड
या तीन जनावरांमध्ये रोमुलस आणि रेमस ही सहा महिन्यांची नर पिल्ले आहेत, तर खालिसी ही तीन महिन्यांची मादी आहे. ही पिल्ले सध्या अमेरिकेतील एका गुप्त ठिकाणी वाढवली जात असून त्यांच्यावर संशोधन सुरू आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. यातील एका भारतीय वापरकर्त्यानं, कौस्तुभनं, X वर प्रश्न विचारला, “हे खरे आहे का?” त्याला उत्तर देताना पर्प्लेक्सिटी AI ने स्पष्ट केले की, “हा दावा खरा आहे. कोलोसल बायोसायन्सेसनं जीन-एडिटिंग आणि प्राचीन डीएनए विश्लेषणाद्वारे डायर वुल्फ पिल्लांचं पुनर्जनन केलं आहे. त्यांनी 10,000 वर्षांनंतर प्रथमच डायर वुल्फच्या ओरडण्याचा आवाजही रेकॉर्ड केला आहे.”
We’re Colossal Biosciences, the de-extinction company responsible for bringing back the first animals from extinction. Our dire wolf pups, Romulus and Remus, were born on October 1, 2024. Watch these pups grow up on our YouTube channel. Link in bio.
— Colossal Biosciences® (@colossal) April 7, 2025
These two wolves were… pic.twitter.com/hbk1wFQ3lf
ही तर फक्त सुरुवात
यावर कोलोसल बायोसायन्सेसनं प्रतिसाद देताना त्यांच्या यूट्यूब चॅनेलची लिंक शेअर केली आणि म्हटलं, “ही तर फक्त सुरुवात आहे. या आश्चर्यकारक प्राण्यांना वाढताना यूट्यूबवर पाहा.” कंपनीच्या शास्त्रज्ञांनी ओहायोमध्ये सापडलेल्या 13,000 वर्षे जुन्या डायर वुल्फच्या दाताचा आणि आयडाहोमध्ये सापडलेल्या 72,000 वर्षे जुन्या कवटीच्या तुकड्याचा अभ्यास केला. हे दोन्ही नमुने नैसर्गिक इतिहास संग्रहालयातून घेण्यात आले होते.
SOUND ON. You’re hearing the first howl of a dire wolf in over 10,000 years. Meet Romulus and Remus—the world’s first de-extinct animals, born on October 1, 2024.
— Colossal Biosciences® (@colossal) April 7, 2025
The dire wolf has been extinct for over 10,000 years. These two wolves were brought back from extinction using… pic.twitter.com/wY4rdOVFRH
ग्रे वुल्फच्या रक्त पेशींमध्ये बदर
कंपनीच्या मुख्य शास्त्रज्ञ बेथ शापिरो यांनी सांगितलं की, ग्रे वुल्फच्या रक्त पेशींमध्ये CRISPR तंत्रज्ञानानं 20 ठिकाणी बदल करण्यात आले. त्यानंतर हे जनुकीय साहित्य घरगुती कुत्र्याच्या अंडपेशीत हस्तांतरित केले गेले. तयार झालेले भ्रूण घरगुती कुत्र्यांच्या गर्भाशयात प्रत्यारोपित करण्यात आले आणि 62 दिवसांनंतर ही पिल्ले जन्माला आली. या पिल्लांना पांढरे केस आणि डायर वुल्फसारखे सशक्त जबडे आहेत, जे त्यांच्या प्राचीन पूर्वजासारखे. यापूर्वीही कोलोसलनं वूल्ली मॅमथ, डोडो आणि इतर नामशेष प्रजातींच्या पुनर्जननाचे प्रकल्प जाहीर केले आहेत. या नव्या यशामुळं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन चर्चांना उधाण आले आहे.
हे वाचलंत का :