हैदराबाद : रियलमी नारझो 80 प्रो 5G आणि नारझो 80x 5G हे स्मार्टफोन भारतात 9 एप्रिल रोजी लॉंच होणार आहेत. अधिकृत लॉंचच्या काही दिवस आधी, रियलमीनं या नवीन नारझो सीरिज स्मार्टफोन्सच्या अर्ली बर्ड आणि मर्यादित कालावधीच्या विक्रीची माहिती जाहीर केली आहे. चीनी स्मार्टफोन ब्रँडनं विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑफर्स आणि स्मार्टफोन्सवर विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. दोन्ही हँडसेट मीडियाटेक डायमेन्सिटी चिपसेटसह येणार असून, ते ॲमेझॉनद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होतील.
The wait is almost over, gamers! A new immersive experience arrives in less than 2 days.
— realme narzo India (@realmenarzoIN) April 7, 2025
The #realmeNARZO80Pro5G is set to dominate the game with its arrival.
Catch the big launch only on Amazon Live!
Are you #ReadyToWin?
Early Access Sale: April 9th| 6PM–Midnight
Know more:… pic.twitter.com/T16Bw0yo6m
रियलमी नारझो 80 प्रो 5G अर्ली बर्ड सेल
रियलमी नारझो 80 प्रो 5G अर्ली बर्ड सेल 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:00 ते मध्यरात्रीपर्यंत अॅमेझॉन आणि रियलमी इंडिया वेबसाइटवर होईल. हा हँडसेट 11 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:00 ते मध्यरात्रीपर्यंत रियलमी नारझो 80x 5G सोबत मर्यादित कालावधीसाठी विक्रीसाठी उपलब्ध असेल.
Gaming beasts, this one’s for you! 👾
— realme narzo India (@realmenarzoIN) April 1, 2025
The #realmeNARZO80Pro5G dominates with a 780K+ AnTuTu score, MediaTek Dimensity 7400, and segment’s largest VC cooling - all under ₹20K! Plus, students get exclusive benefits of up to ₹1,299/- during the first sale period!
Live &… pic.twitter.com/x7BUMlnxO6
रियलमी नारझो 80 प्रो 5G विद्यार्थी ऑफर्स
रियलमी नारझो 80 प्रो 5G ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असेल, तर रियलमी नारझो 80x 5G ची किंमत 13,000 रुपयांपेक्षा कमी असेल. कंपनीनं रियलमी नारझो 80 प्रो 5G साठी विद्यार्थ्यांना 1,299 रुपयांचा विशेष लाभ जाहीर केला आहे. विद्यार्थी त्यांची ओळख सत्यापित करून पहिल्या विक्री कालावधीत एक वर्षाची स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन विनामूल्य मिळवू शकतात. ही ऑफर 9 एप्रिल ते 18 एप्रिल या खरेदी कालावधीत उपलब्ध असेल आणि विद्यार्थ्यांना 28 एप्रिलपर्यंत सत्यापन आणि लाभ नोंदणी पूर्ण करावी लागेल.
- realme today announced special Early Bird and Limited Period Sales, as well as an exclusive benefit for students buying the Narzo 80 Pro 5G
— Mukul Sharma (@stufflistings) April 7, 2025
- The Early Bird Sale for the realme Narzo 80 Pro 5G will be held on April 9, 2025, from 6 PM to midnight, on Amazon and realme website
-… pic.twitter.com/48nCA7vJdy
दोन्ही फोनमध्ये 6,000 mAh बॅटरी
यशस्वी सत्यापित झाल्यावर, त्यांच्या खात्यात पात्रता प्रमाणपत्र कूपन जोडलं जाईल आणि एक वर्षाची स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन 8 मे रोजी जारी केली जाईल. रियलमी नारझो 80 प्रो 5G नवीन मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 SoC वर चालतो, तर नारझो 80x 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 प्रोसेसर आहे. दोन्ही फोनमध्ये 6,000 mAh बॅटरी आणि IP69 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स प्रमाणपत्र आहे. प्रो मॉडेल 80W चार्जिंगला सपोर्ट करतो, तर नारझो 80x 5G मध्ये 45W फास्ट चार्जिंग आहे.
लॉंच ॲमेझॉनवर लाइव्ह-स्ट्रीम
रियलमी नारझो 80 प्रो 5G BGMI साठी 90fps सपोर्ट करतो. फोनचा डिस्प्ले 4,500 निट्स पीक ब्राइटनेस देईल असा दावा आहे. यात 6,050 मिमी स्क्वेअर VC कूलिंग सिस्टम आणि 7.55 मिमी जाडी आहे. रियलमी नारझो 80x 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि मिलिट्री-ग्रेड शॉकप्रूफ बिल्ड आहे. रियलमी नारझो 80 प्रो 5G आणि नारझो 80x 5G चे लॉंच 9 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता IST होईल. लॉंच ॲमेझॉनवर लाइव्ह-स्ट्रीम केलं जाईल.
हे वाचलंत का :