ETV Bharat / technology

PM E Drive सबसिडी योजना सुरू, इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सरकार देणार सबसिडी - PM E Drive Subsidy Scheme

PM E Drive Subsidy Scheme : इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल (FAME) योजनेनंतर केंद्र सरकारनं आता PM इलेक्ट्रिक ड्राइव्ह रिव्होल्यूशन इन इनोव्हेटिव्ह व्हेईकल एन्हान्समेंट (PM E Drive) योजना सुरू केली आहे. चला जाणून घेऊया काय आहे योजना?

author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 2, 2024, 2:07 PM IST

Tata Nexon, Tata Curve, TVS iQube
टाटा नेक्सॉन, टाटा कर्व, TVS iQube (Tata Mothers, TVS)

हैदराबाद PM E Drive Subsidy Scheme : भारत सरकारनं PM ई ड्राइव्ह योजना (PM E Drive) सुरू केलीय. या योजनेचा उद्देश देशातील इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) प्रोत्साहन देणं, इलेक्ट्रिक मोबिलिटीला सक्षम करणं आहे. या (PM E Drive) योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं 11 सप्टेंबर 2024 रोजी मंजुरी दिलीय. या योजनेचं एकूण बजेट 10 हजार 900 कोटी रुपये ठेवण्यात आलं आहे. पुढील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवणं तसंच देशभरात आवश्यक चार्जिंग पायाभूत सुविधा विकसित करणं, हे या योजनेचं उद्दिष्ट आहे.

एकूण बजेट 10 हजार 900 कोटी : केंद्र सरकारनं मंगळवारी 10 हजार 900 कोटी रुपयांच्या खर्चासह प्रधानमंत्री ई ड्राइव्ह योजना (PM E Drive) सुरू केलीय. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणं, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची स्थापना करणं, EV उत्पादन विकसित करणं या योजनेचं उद्दिष्ट आहे. ही योजना 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2026 या कालावधीत लागू असेल.

इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम : 1 एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत EMPS (इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम) राबविण्यात येत आहे. इलेक्ट्रिक टू व्हीलरसाठी पीएम ई ड्राइव्ह योजनेंतर्गत सबसिडी देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. परंतु पहिल्या वर्षी एकूण प्रोत्साहन 10 हजार रुपयांपेक्षा जास्त नसणार आहे. दुसऱ्या वर्षी ते 2 हजार 500 रुपये प्रति किलोवॅट तास केलं जाईल.

इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन : केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी मंगळवारी लॉन्च केलेल्या पीएम ई ड्राइव्ह योजनेंतर्गत प्रोत्साहनांचा लाभ घेताना वाहन उत्पादकांना मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्यास सांगितलंय. FAME II (फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स) योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आर्थिक प्रोत्साहन मिळविण्यासाठी काही कंपन्यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं FAME 2 योजनेप्रमाणे यात वादाला वाव नसावा, असंही ते म्हणाले. फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स (FAME-II) मुळं भारतात उत्पादित घटकांचा वापर करून इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं आहे. मात्र, अवजड उद्योग मंत्रालयानं केलेल्या तपासणीत काही कंपन्यांनी आयात केलेले घटक वापरल्याचं समोर आलं होतं.

मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करा : निनावी ईमेल मिळाल्यानंतर मंत्रालयानं तपास केला. ज्यामध्ये अनेक ईव्ही उत्पादक इलेक्ट्रिक वाहनांच्या घरगुती उत्पादनाला चालना देण्यासाठी फेज्ड मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन (पीएमपी) नियमांचं पालन न करता सबसिडीचा दावा करत आहेत, असल्याचा उल्लेख कण्यात आला होता. यावेळी कुमारस्वामी म्हणाले, "शेवटी मी आमच्या उत्पादकांना विनंती करतोय, कारण FAME 2 योजनेत उत्पादक आणि आमचं मंत्रालय यांच्यात काही मतभेद आहेत. कारण 2-3 उत्पादक कंपन्यानी योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं नाहीय." पीएम ई ड्राइव्हच्या लॉन्चिंगला संबोधित करताना ते म्हणाले, "माझी सर्व उत्पादकांना विनंती आहे, मला कोणत्याही वादाला वा कोणत्याही मतभेदाला वाव द्यायचा नाही.कृपया आम्ही जी काही मार्गदर्शक तत्त्वं दिली आहेत, त्याचं पालन करावं. "

हे वाचलंत का :

  1. फक्त 436 रुपयात मिळतोय 2 लाखांचा विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा 'असा' घ्या लाभ - PM Jeevan Jyoti Bima Yojana
  2. गुगलनं युवजरसाठी लाँच केलं 'हे; अप्रतिम फीचर, जाणून घ्या काय आहे खास - Google Gemini Live Feature Launch
  3. Citroen C3 Aircross ची नव्या लुकसह दमदार एंन्ट्री, इंजिनसह केला नावात बदल - Citroen C3 Aircross

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.