हैदराबाद : वनप्लसनं भारत आणि जागतिक बाजारपेठेसाठी 8 जुलै रोजी आपला समर लॉंच इव्हेंट जाहीर केला आहे. या इव्हेंटमध्ये बहुप्रतीक्षित वनप्लस नॉर्ड 5, नॉर्ड CE 5 आणि वनप्लस बड्स 4 लॉंच केले जाणार आहेत. नॉर्ड CE 5 मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 चिपसेट असेल, तर बड्स 4 मध्ये ड्युअल DAC ड्रायव्हर्स आणि LHDC 5.0 ऑडिओ तंत्रज्ञानाचा समावेश असेल. हे डिव्हाइसेस वनप्लसच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअर आणि Amazon India वर विक्रीसाठी उपलब्ध होतील.
OnePlus Summer Launch Event
वनप्लसनं जाहीर केलं आहे की, 8 जुलै 2025 रोजी दुपारी 2 वाजता भारतात नॉर्ड 5, नॉर्ड CE 5 आणि वनप्लस बड्स 4 लॉंच केले जातील. या डिव्हाइसेसना TUV Rheinland आणि ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) सारख्या प्रमाणन मंचांवर पाहिलं गेलं आहे.
वनप्लस नॉर्ड CE 5 ची भारतातील किंमत
नॉर्ड CE 5 ची बेस व्हेरिएंटची किंमत भारतात अंदाजे 25,000 रुपये असण्याची शक्यता आहे. मध्यम-श्रेणीचा हा स्मार्टफोन परवडणाऱ्या किंमतीत उत्कृष्ट कामगिरी देण्यासाठी डिझाइन केला आहे, ज्यामुळं तो बजेट-सजग ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरेल.
वनप्लस नॉर्ड CE 5 ची वैशिष्ट्ये
नॉर्ड CE 5 मध्ये 6.77-इंच AMOLED डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2392 x 1080 पिक्सल रिझॉल्यूशन ऑफर करेल. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 128GB किंवा 256GB स्टोरेज पर्याय असतील. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर, नॉर्ड CE 5 मध्ये 50MP प्रायमरी सेन्सर आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्ससह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असेल, तर समोर 16MP सेल्फी शूटर असण्याची शक्यता आहे. यात 5,200mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. रंग पर्यायांमध्ये ब्लॅक इन्फिनिटी आणि मार्बल मिस्ट यांचा समावेश असू शकतो.
OnePlus Buds 4
नॉर्ड 5 मालिकेसोबत OnePlus Buds 4 देखील लाँच केले जात आहे. वायरलेस इअरबड्समध्ये ड्युअल ड्रायव्हर्स, ड्युअल DAC, हाय-रेझ LHDC 5.0 साठी सपोर्ट आणि 3D ऑडिओ आहे. गेमर्स आणि ऑडिओ प्रेमींसाठी बनवलेलं, बड्स 4 मध्ये कमी-लेटन्सी मोड आहे, जो गेम मोडमध्ये 47ms प्रतिसाद देतो. हे बर्ड दोन झेन ग्रीन आणि स्टॉर्म ग्रे रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असतील.
Enjoy front-row seats to a soundstage filled with balanced, true-to-life acoustics.https://t.co/wwNfcaIghf pic.twitter.com/JQSXqfj9t3
— OnePlus (@oneplus) June 20, 2025
हे वाचलंत का :