हैदराबाद : वनप्लस कंपनीचा पहिल्या ॲल्युमिनियम युनिबॉडी डिझाइन असलेल्या वनप्लस नॉर्ड 5 जुलैमध्ये लॉंच होणार असल्याची चर्चा सुरू झालीय. यासोबतच वनप्लस नॉर्ड CE 5 स्मार्टफोनही लॉंच होण्याची शक्यता आहे. टंक साईकुमार टिप्स्टरनं या स्मार्टफोन्सच्या लॉंच तारखेबाबत संकेत दिले असून, ते पुढील महिन्यात म्हणजेच 8 जुलै 2025 रोजी लॉंच होणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, हे फोन जागतिक आणि भारतीय बाजारपेठेत एकाच वेळी लॉंच होतील की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही.
OnePlus Nord 5 & OnePlus Nord CE 5 are launching on 8th July in India.
— Tunk SaiKumar (@tsaikumar1989) June 10, 2025
Via: @heyitsyogesh #Oneplus #OneplusNordCE5 #OneplusNord5 https://t.co/Xn7LjII5w1 pic.twitter.com/O4HSzwr8qb
एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर टिप्स्टर टंक साईकुमार (Tunk SaiKumar) यांनी पोस्ट केली की, वनप्लस नॉर्ड 5 आणि नॉर्ड CE 5 हे 8 जुलै रोजी लॉंच होणार आहेत. यापूर्वी दुसऱ्या एका टिप्स्टरनं जून ते जुलै दरम्यान लॉन्चिंग होण्याचे संकेत दिले होते. भारतात वनप्लस नॉर्ड 5 ची किंमत सुमारे 30,000 रुपये असण्याची शक्यता आहे.
वनप्लस नॉर्ड 5 आणि नॉर्ड CE 5 चे अपेक्षित वैशिष्ट्ये
वनप्लस नॉर्ड 5 मध्ये 1.5K रिझोल्यूशनचा फ्लॅट OLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 9400e प्रोसेसर वापरला जाईल. कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा OIS असलेला प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा असू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. यात 6,650mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट असू शकतो.
दुसरीकडं, वनप्लस नॉर्ड CE 5 मध्ये 6.7 इंचाचा फ्लॅट OLED डिस्प्ले असून, त्याचा रिझोल्यूशन 1080p असेल. यात 4nm डायमेन्सिटी 8350 SoC, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा (सोनी LYT-600 किंवा IMX882 सेन्सर) आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स असेल. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. यात 7,100mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट अपेक्षित आहे.
हे वाचलंत का :