हैदराबाद : निसाननं आपली सहावी आवृतीची निसान मायक्रा इलेक्ट्रिक सादर केली आहे. जी प्रथमच पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहन (EV) म्हणून बाजारात येत आहे. युरोपात 2025 च्या उत्तरार्धात विक्रीसाठी उपलब्ध होणारी ही नवीन मायक्रा कार स्टायलिश डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि प्रभावी रेंजसह येणार असून ती शहरी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खास असेल.
नवीन स्वरूप आणि इलेक्ट्रिक शक्ती
निसान मायक्रामध्ये 18-इंच व्हील असून “Active” व्हील कव्हर्स, “Iconic” आणि “Sport” अलॉय डिझाइन्सचे पर्याय उपलब्ध आहेत. विशिष्ट हेडलॅम्प्स कार अनलॉक करताना “वेलकम विंक” आणि लॉक करताना “फेअरवेल” सिक्वेन्ससह कोरियोग्राफ केलेली कामगिरी करतात. रियर टेललॅम्प्समध्ये मोहक वर्तुळाकार LED एलिमेंट्स आहेत.
निसान मायक्रा इंटीरियर
निसान मायक्रा 1.8 मीटर रुंदी आणि 2.54 मीटर व्हीलबेससह, 326 लिटर बूट स्पेस ऑफर करते. मायक्राच्या आतमध्ये 10.1-इंच कॉन्फिगरेबल ड्रायव्हर डिस्प्ले, 10.1-इंच टचस्क्रीन नेव्हिगेशन, ऑडिओ फक्शन आहे. मॉडर्न, ऑडेशियस आणि चिल अशा तीन इंटीरियर ट्रिम्सचा यात पर्याय आहे.
परफॉर्मन्स आणि रेंज
मायक्रा EV दोन बॅटरी पर्यायांसह येते: 40 kWh बॅटरी 308 किमी रेंज देते आणि 52 kWh बॅटरी 408 किमी रेंज मिळते. कमाल पॉवर आउटपुट्स अनुक्रमे 90 kW आणि 110 kW आहेत. तर या कारचा टॉर्क 245 Nm पर्यंत आहे.
30 मिनिटांत 80% चार्ज
चार्जिंगच्या बाबतीत, 52 kWh मॉडेल 100 kW DC चार्जरला सपोर्ट करतं (40 kWh साठी 80 kW), ज्यामुळं कार 15% ते 80% चार्ज 30 मिनिटांत होते. स्टँडर्ड हीट पंप आणि बॅटरी हीटिंग/कूलिंग सिस्टम चार्जिंग कार्यक्षमता वाढवते. याशिवाय, व्हेइकल-टू-लोड (V2L) तंत्रज्ञान बॅटरीद्वारे बाह्य उपकरणांना पॉवर देण्याची सुविधा देतं. AmpR शेअर्ड EV प्लॅटफॉर्मवर बनलेली मायक्रा फ्रंट स्ट्रट्स आणि मल्टी-लिंक रियर सस्पेंशनसह उत्कृष्ट राइड क्वालिटी आणि हँडलिंग प्रदान करते, जी उच्च-सेगमेंट वाहनांशी स्पर्धा करते.
तंत्रज्ञान आणि सुरक्षितता
मायक्रा NissanConnect ला Google बिल्ट-इन सर्व्हिसेससह एकत्रित करतं, ज्यामुळं कनेक्टेड ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. NissanConnect अॅपद्वारे केबिन तापमान, चार्जिंग शेड्यूल आणि बॅटरी मॉनिटरिंग यासारख्या वैशिष्ट्यांचं रिमोट कंट्रोल शक्य आहे. मायक्रामध्ये Nissan ProPilot Assist आणि प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्सचा समावेश आहे.
हे वाचलंत का :