हैदराबाद : मोटोरोला लवकरच जबरदस्त नवीन गॅजेट्स घेऊन येत आहे, ज्यात स्टायलिश फोल्डेबल फोन आणि त्यांच्या पहिल्या लॅपटॉपचा समावेश आहे! मोटोरोला रेजर 60 अल्ट्रा आणि मोटोरोला एज 60 प्रो 24 एप्रिल 2035 रोजी लाँच करणार असल्याचं जाहीर केलंय. लाँचचं पोस्टर “AI” आकारात बनवलं असून फोनमध्ये नव्या AI फीचर्सचा अंदाज यावरून यतोय. हे फोन आधी युरोप आणि अमेरिकेत येतील, नंतर ते भारतात लॉंच होणार आहेत. मोटोरोलानं या फोनची जास्त माहिती दिली नसली, तरी लीकमुळं या फोन्सच्या काही खास गोष्टी समोर आल्या आहेत.
Big reveals. Iconicdesigns. Coming 4/24 🤫. #MakeItIconic #GatewayToIconic pic.twitter.com/PhfPg4o71h
— motorola (@Moto) April 10, 2025
रेजर 60 अल्ट्रा : काय खास आहे?
रेजर 60 अल्ट्रा मध्ये 6.96 इंचांचा लवचिक POLED डिस्प्ले आणि 4 इंचांचा बाहेरील स्क्रीन असेल. यात स्नॅपड्रॅगन 8 जेन एलिट प्रोसेसर आणि 16 जीबी रॅम असेल. याला 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा (OIS) आणि 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा (2x झूम) मिळेल. 4,500 mAh बॅटरी 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
एज 60 प्रोमध्ये काय असेल खास?
एज 60 प्रोमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 प्रोसेसर आणि 12 जीबी रॅम असेल. यात 6.67 इंचांचा POLED डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह येईल. याला तीन कॅमेरे असतील: 50 मेगापिक्सेल मुख्य, 13 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि 50 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा मिळेल. यात 6,000 mAh बॅटरी 90W फास्ट चार्जिंगसह देखील मिळेल.
मोटोरोला एज 60 प्रो, मोटोरोला रेझर 60 अल्ट्रा किंमत (अपेक्षित)
मोटोरोला रेझर 60 अल्ट्राची किंमत निवडक युरोपीय बाजारपेठांमध्ये 12 जीबी + 512 जीबी पर्यायासाठी EUR 1,346.90 (अंदाजे रु. 1,24,000) असण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडं, मोटोरोला एज 60 प्रोची किंमत समान रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनसाठी EUR 649.89 (अंदाजे रु. 60,000) असण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का :