हैदराबाद : चिनी स्मार्टफोन ब्रँड मोटोरोला भारतात टॅबलेट आणि लॅपटॉप बाजारात प्रवेश करत आहे. कंपनी 17 एप्रिल रोजी Motorola Pad 60 Pro आणि Motorola Book 60 लॉंच करणार आहे. यापूर्वी असं संकेत होते की हे दोन्ही डिव्हाइसेस Moto Edge 60 Stylus सोबत लॉंच होऊ शकतात, परंतु आता Moto Edge 60 Stylus स्वतंत्रपणे 15 एप्रिल रोजी लॉंच झालाय. फ्लिपकार्टच्या मायक्रोसाइट्सवर या डिव्हाइसेसच्या लॉंच तारखेसह प्रमुख वैशिष्ट्यांची माहिती समोर आली आहे.
The all-new #MotoBook60 isn’t just powerful — it’s Pantone-validated pretty.
— Motorola India (@motorolaindia) April 14, 2025
From seamless smart connect experiences to stunning curated colours, this one’s built to perform and turn heads.
Time to colour your world, Moto style...
Motorola Book 60 काय अपेक्षित आहे?
मोटोरोला आणि PANTONE यांच्या भागीदारीमुळं Book 60 मालिकेत PANTONE क्युरेटेड रंग उपलब्ध असतील. फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार, यात 14-इंच 2.4K OLED डिस्प्ले असेल, ज्याची ब्राइटनेस 500 निट्स आहे. हा लॅपटॉप केवळ 1.4 किलो वजनाचा असल्यानं हलका आणि पोर्टेबल आहे. यात Smart Connect फीचर आहे, ज्यामुळं वापरकर्ते सुसंगत डिव्हाइसेस लॅपटॉपशी जोडून एक अखंड डिजिटल इकोसिस्टम तयार करू शकतात. Smart Clipboard फीचरमुळं लॅपटॉप, स्मार्टफोन आणि टॅबलेटवर कॉपी-पेस्ट करणं सोपं होईल, तर File Transfer फीचरमुळं डिव्हाइसेसमध्ये जलद फाइल हस्तांतरण शक्य होईल.
FoneArena च्या अहवालानुसार, हा लॅपटॉप Intel Core 7 प्रोसेसरनं सुसज्ज असेल, ज्याला 60Wh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जरचा सपोर्ट असेल. यात Dolby Atmos तंत्रज्ञानानं युक्त ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स असतील.
Motorola Pad 60 Pro मध्ये काय असेल खास?
Motorola Book 60 प्रमाणेच Pad 60 Pro मध्येही PANTONE क्युरेटेड रंग असतील. यात 12.7-इंच 3K रिझोल्यूशन डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. हा टॅबलेट MediaTek Dimensity 8300 चिपसेटद्वारे संचालित असेल. ऑडिओसाठी, यात Dolby Atmos तंत्रज्ञानासह क्वाड JBL स्पीकर्स असतील. यात 10,200mAh बॅटरी आहे, जी 45W TurboPower चार्जिंगला सपोर्ट करते. मोटोरोलाच्या दाव्यानुसार, ही बॅटरी 10 तासांपर्यंत टिकेल.
MotoPen Pro
Pad 60 Pro सोबत MotoPen Pro बंडल केलं जाईल आणि यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शोध आणि भाषांतर वैशिष्ट्ये असतील. फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार, यात Smart Connect तंत्रज्ञान आहे, ज्यामुळं मोठ्या स्क्रीनसह अखंड एकीकरण शक्य होईल.
हे वाचलंत का :