हैदराबाद : मोटोरोला हा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन भारतात लवकरच लॉंच होत आहे. कंपनीने लॉंचपूर्वी फोनचे रंग पर्याय आणि उपलब्धतेची माहिती उघड केली आहे. अधिकृत वेबसाइटवरील लिस्टिंगद्वारे फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांची पुष्टी झाली असून, यामध्ये स्नॅपड्रॅगन 7s जेन 2 प्रोसेसर, इनबिल्ट स्टायलस आणि 50 मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा यांचा समावेश आहे. हा फोन 2 एप्रिल रोजी भारतात सादर झालेल्या मोटोरोला एज 60 फ्यूजनसह बाजारात येण्याची शक्यता आहे.
मोटोरोला एज 60 स्टायलस लॉंच
मोटोरोला एज 60 स्टायलस 15 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता भारतात लॉंच होणार आहे, अशी माहिती कंपनीने एका X पोस्टद्वारे दिली. हा फोन फ्लिपकार्ट, मोटोरोला इंडिया वेबसाइट आणि निवडक रिटेल स्टोअरमधून खरेदीसाठी उपलब्ध असेल. सेगमेंटमधील पहिला इनबिल्ट स्टायलस असलेला स्मार्टफोन म्हणून याकडे पाहिले जात आहे. लीकनुसार, 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये असण्याची शक्यता आहे.
मोटोरोला एज 60 स्टायलसची वैशिष्ट्ये
मोटोरोला एज 60 स्टायलस 6.67-इंच 1.5K (1,220x2,712 पिक्सेल) 2.5D pOLED डिस्प्लेसह येईल. यात 120Hz रिफ्रेश रेट, 300Hz टच सॅम्पलिंग रेट, 3,000 निट्स पीक ब्राइटनेस, SGS लो ब्लू लाइट आणि मोशन ब्लर रिडक्शन प्रमाणपत्रे, कॉर्निंग गोरिला 3 प्रोटेक्शन आणि अॅक्वा टच सपोर्ट आहे.
तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स
हा फोन स्नॅपड्रॅगन 7s जेन 2 SoC, 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB UFS2.2 स्टोरेजसह येतो. मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल. फोन अँड्रॉइड 15-आधारित हॅलो UI वर चालेल आणि दोन वर्षांचे OS अपग्रेड तसेच तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सेल Sony LYTIA 700C प्रायमरी सेन्सर, 13-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड शूटर आणि डेडिकेटेड 3 i लाइट सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा 32-मेगापिक्सेलचा आहे.
कनेक्टिव्हिटी पर्याय
इनबिल्ट स्टायलस फोनच्या खालच्या काठावरील स्लॉटमध्ये ठेवलेले आहे. यात Dolby Atmos-बॅकड ड्युअल स्टिरिओ स्पीकर, 5G, 4G, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.4, GPS, Glonass, Galileo, NFC आणि USB टाइप-C पोर्ट यासारखे कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत.
15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट
फोनमध्ये 5,000mAh बॅटरी असून, ती 68W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, MIL-STD-810H प्रमाणपत्र आणि IP68 डस्ट व वॉटर रेझिस्टन्स रेटिंग आहे. फोनचे परिमाण 162.15x74.78x8.29mm आणि वजन 191 ग्रॅम आहे.
हे वाचलंत का :