हैदराबाद : मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन, मोटोरोला एज 60, भारतात 10 जून 2025 रोजी लाँच करणार आहे. कंपनीनं या स्मार्टफोनचे रंग आणि रॅम-स्टोरेज पर्याय जाहीर केले आहेत. हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. यापूर्वी एप्रिलमध्ये मोटोरोला एज 60 आणि एज 60 प्रो जागतिक बाजारात लाँच झाले होते. भारतीय आवृत्ती मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसरवर चालेल, तर जागतिक आवृत्ती मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 SoC वर आधारित आहे. यात 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
Wrapped in stunning PANTONE™ Gibraltar Sea and PANTONE™ Shamrock, with IP68 + IP69 protection for unbeatable durability.
— Motorola India (@motorolaindia) June 6, 2025
Launching on 10th June on Flipkart | https://t.co/azcEfy2uaW | leading retail stores.#Motorola #EdgeOfExpression #MotorolaEdge60
मोटोरोला एज 60 ची वैशिष्ट्ये
मोटोरोला एज 60 मध्ये अँड्रॉइड 15-आधारित हॅलो यूआय आहे. यात 6.67-इंच 1.5K pOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 4,500 निट्स आहे, तसंच कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i संरक्षण आहे. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा (सोनी LYTIA 700C सेन्सर), 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 3x ऑप्टिकल झूमसह 10-मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 50-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन IP68 + IP69 प्रमाणनासह येतो आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह स्टीरिओ स्पीकर्स आहेत. भारतीय आवृत्तीमध्ये 5,500mAh बॅटरी आणि 68W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग आहे, तर जागतिक आवृत्तीत 5,200mAh बॅटरी आहे.
Clarity that speaks.
— Motorola India (@motorolaindia) June 5, 2025
A camera designed to express what words can’t.
Coming soon.#Staytuned #Motorola pic.twitter.com/Q7vd9XrxmB
किती असेल किंमत
भारतात या फोनची किंमत अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु युरोपमध्ये याची किंमत GBP 379 (अंदाजे 43,000 हजार रुपय) आहे. भारतात हा फोन पँटोन गिब्राल्टर सी आणि पँटोन शॅमरॉक रंगांमध्ये 12GB रॅम + 256GB स्टोरेज पर्यायासह उपलब्ध असेल.
motorola edge 60 launching on June 10th in India. pic.twitter.com/Je6wX70lfB
— Mukul Sharma (@stufflistings) June 6, 2025
हे वाचलंत का :